Yoga Tips Sakal
लाइफस्टाइल

Yoga Tips: वयाच्या 40 शीनंतर 'या' योगासनांचा करावा सराव, अनेक आजार राहतील दूर

Yoga Tips: वयाच्या चाळीशीनंतर निरोगी राहायचे असेल तर पुरूषांनी काही योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Yoga Tips: योगा केल्याने शरीर निरोगी राहते. वयानुसार आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. वयाच्या 40 नंतर शरीर कमजोर होऊ लागते. अशावेळी आजारांचा धोका वाढतो. वाढत्या वयाबरोबर, स्नायू दुखणे, हाडांच्या समस्या, त्वचेवर सुरकुत्या आणि फ्रिकल्स दिसतात. महिलांप्रमाणे पुरुषांनाही आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. पण जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या चांगल्या सवयी निरोगी ठेऊ शकतात.

अनेक शारीरिक समस्या आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योगाभ्यास केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि वाढत्या वयाबरोबर होणारे नकारात्मक बदलही कमी होतात. योगासनांचा सराव केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

गोमुखासन

या योग आसनाचा सराव केल्याने सायटीकाची समस्या दूर होते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गोमुखासन उपयुक्त आहे. हा योग खांद्यावरील कडकपणा दूर करण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यास आणि पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतो.

पद्मासन


पद्मासन केल्याने गुडघे आणि नितंबांचे सांधे लवचिक होतात. गुडघे आणि घोट्याला ताणून मजबूत करते. पाठीचा कणा, पोट आणि मूत्राशय उत्तेजित करते. हे मन शांत ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. महिलाही पद्मासनाचा सराव करू शकतात.

विपरितकर्णी

विपरितकर्णी योगासन केल्याने पायांना आराम मिळतो आणि स्नायू मजबूत होतात. हा योग तुम्हाला मानसिक आणि शारीरिक चिंतामुक्त ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. या आसनाचा नियमित सराव सांधेदुखीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो.


अधो मुख स्वानसन

अधोमुख स्वानसनाच्या सरावाने शरीराला खूप फायदे होतात. चाळीशीनंतरच्या पुरुषांनी हा योग नियमित करावा. या योगामुळे पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत होतात. पचनक्रिया सुधारणे, रक्ताभिसरण वाढणे आणि चिंतांवर नियंत्रण ठेवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT