Yoga Tips esakal
लाइफस्टाइल

Yoga Tips : लॅपटॉपवर सतत काम केल्याने पाठदुखीची समस्या वाढलीय? मग, ‘या’ योगासनांचा करा सराव, मिळेल लवकर आराम

Yoga Tips : दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यातच बदललेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे मानसिक आणि शारिरीक समस्या वाढताना दिसत आहेत.

खास करून जे लोक दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात, त्यांच्यामध्ये पाठदुखी आणि मानदुखीच्या समस्या जास्त प्रमाणात दिसून येत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये लोकांना पाठीत तीव्र वेदना होतात आणि मान देखील व्यवस्थित वळवता येत नाही. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनक्रमात विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश करणे आवश्यक आहे.

नियमित योगासने केल्याने तुमच्या शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो. ज्यामुळे, तुम्हाला पाठदुखी आणि मानदुखीपासून आराम मिळू शकतो. कोणती आहेत ही योगासने? ज्यांचा सराव केल्याने तुमची पाठदुखी आणि मानदुखीच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात.

भूजंगासन

ऑफिसमध्ये काम करताना मान वाकवल्याने होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी भूजंगासन हे योगासन फायदेशीर आहे. या योगासनाला कोब्रा पोझ किंवा सर्पासन असे ही म्हटले जाते. हे योगासन पाठदुखी, खांदेदुखी आणि कंबरदुखीसाठी अतिशय प्रभावी मानले जाते.

नियमित हे योगासन केल्याने मणका आणि मानेला आधार देणारे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे, तुम्हाला पाठदुखी आणि मानदुखीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. मानसिक अन् शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे योगासन नियमित करा.

बालासन

बालासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. बालासनाला चाईल्ड पोझ असे ही म्हटले जाते. मानसिक अन् शारिरीक आरोग्य तंदूरूस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित हे योगासन करू शकता.

हे योगासन केल्याने पाठदुखी अन् मानदुखीपासून आराम मिळू शकतो. शिवाय, हे योगासन करायला ही अतिशय सोपे आहे. या आसनामुळे शरीराला चांगला ताण मिळतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांना मानदुखी आणि पाठदुखीची समस्या आहे, अशा लोकांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT