fridge  sakal
लाइफस्टाइल

Food Storage Mistakes: फ्रीजमध्ये तुम्ही अन्न चुकीच्या पद्धतीनं तर ठेवत नाही ना, होऊ शकते शरीराचे नुकसान

आपण अनेकदा काही खाद्यपदार्थ चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवतो.

Aishwarya Musale

फ्रिज हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय घर अपूर्ण वाटते. बदलत्या काळात कोणाकडेही एवढा वेळ नाही की ते तिन्ही वेळा जेवण बनवण्यासाठी किंवा भाजीपाला आणि खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जावे, अशा स्थितीत फ्रिजचे महत्त्व अधिकच वाढते, किंवा त्याचा वापर करणे ही आपली मजबुरी आहे, अन्यथा अन्न जास्त काळ ताजे राहणार नाही आणि बुरशीचा धोका वाढेल.

फ्रिजमध्ये फूड स्टोर करताना असे करू नका

फ्रिज आपल्यासाठी कितीही उपयुक्त असला तरी त्याच्या वापराबाबत काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. फ्रिजमध्ये अन्न स्टोर करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

1. गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका

तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकले असेल की फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवू नका, याचे कारण म्हणजे त्यामुळे भरपूर वाफ तयार होते, ज्यामुळे आर्द्रता वाढते. फ्रीजमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे अन्न खराब होऊ शकते ज्यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते. म्हणूनच प्रथम गरम पदार्थ सामान्य तापमानात आणा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा.

2. कापलेली फळे आणि भाज्या अशा प्रकारे ठेवू नका

बर्‍याच वेळा, आपण ताजी फळे आणि भाज्या आधीच कापून फ्रीजमध्ये घट्ट डब्यात ठेवतो, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर किंवा जेवणाच्या वेळी ते खाणे किंवा बनवणे सोपे होईल, परंतु ही पद्धत चुकीची आहे. पहिली गोष्ट म्हणजे या गोष्टी कट केल्याने त्यातील ओलावा हळूहळू जाऊ लागतो आणि घट्ट डब्यात भरल्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात.

3. प्लास्टिकचे डबे टाळा

आजचे युग हे प्लॅस्टिकचे आहे, त्याशिवाय आपण काम करू शकत नाही, या मटेरिअलपासून बनवलेले डब्बे खूप स्वस्त आहेत आणि फ्रिजमध्ये अन्न स्टोर करणे सोपे आहे, परंतु बहुतेक आरोग्य तज्ञ त्याचा वापर न करण्याचा सल्ला देतात कारण प्लास्टिकमध्ये अन्न ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. त्याऐवजी मातीच्या, काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात अन्न ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT