youth found cure for mental stress health  Sakal
लाइफस्टाइल

Stress : तरुणाईने शोधलंय मानसिक ताणावरील उत्तर

मानसिक तणाव मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना असा एकही व्यक्ती नाही ज्याला मानसिक तणाव नाही.

सकाळ वृत्तसेवा

- साक्षी मोरे

मानसिक तणाव मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना असा एकही व्यक्ती नाही ज्याला मानसिक तणाव नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांना मानसिक तणाव आहे. यात सर्वाधिक तणावातून जाणाऱ्या तरुणाईने मानसिक तणावावर उत्तर शोधले आहे.

कारण आजची तरुणाई व्यक्त व्हायला लागली आहे. त्यामुळे ताण हलका होतोय. ही बाब व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे. तरुणाईने त्यांच्या मानसिक ताणावरचे उत्तर नक्कीच शोधले आहे.

  • सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने आजचा तरुण सजग झाला आहे. त्यामुळे मानसिक तणावावर शेअरिंग वाढले आहे. ज्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आहेत.

  • मी अशी का दिसते किंवा मला हे येत नाही, यावर तरुणांनी टेन्शन घेत नाही कारण त्यांना हे चांगलेच उमगले आहे की माझ्यात एखाद्या गोष्टीची कमी असेल तर चार चांगल्या गोष्टी माझ्यात आहेत. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींवरून नर्व्हस होणे आजच्या तरुणाईला अपेक्षित नाही.

  • आजच्या तरुणांना फॅमिली सपोर्ट वाढला आहे. त्यामुळे घरच्याकडून चांगल्या गोष्टी मिळतात. ज्यामुळे तणाव कितीही आला तरी तो चुटकीसरशी दूर पळतो. तरुणांना समजून घेणारे असल्याने तणावाचा प्रश्न कमी झाल्याचे मला वाटते.

  • डिप्रेशन यूथचा मोठा विषय असला तरी त्यांनी त्यापासून स्वतःची सोडवणूक कशी करायची, यावर उपाय शोधला आहे. मित्र-मैत्रिणींचे एकमेकांमध्ये शेअरिंग वाढल्याने तरुणाईमधील तणाव कमी व्हायला लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT