Health Care sakal
लाइफस्टाइल

Health Care News: मुलांचं मानसिक नुकसान करतंय इंटरनेटचं व्यसन, डिप्रेशन अन् एन्झायटीचं प्रमाण वाढलं

मुलांचं मानसिक नुकसान करतंय इंटरनेटचं व्यसन

Aishwarya Musale

इंटरनेटच्या व्यसनामुळे तरुणाई तणाव, नैराश्य आणि चिंतेचे बळी ठरत आहे. विडी, सिगारेट, तंबाखू, गांजा आदींचे व्यसन ही पूर्वीपेक्षा मोठी आरोग्य समस्या असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता तरुणांमध्ये इंटरनेटचे व्यसन त्यांना आजारांकडे ढकलत आहे.

सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येण्याच्या स्थितीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक फेसबुक यूजर दिवसातील कमीत कमी एक तास आणि इन्स्टाग्रामवर दीड तास तर व्हॉट्‌सॲप चॅटवर अख्खा दिवस घालवत असल्याचे दिसून येते.

डॉ. आर.पी. बेनिवाल, प्रोफेसर, मानसोपचार विभाग, RML हॉस्पिटल यांच्या नेतृत्वाखाली, ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान चिंता, तणाव आणि नैराश्याच्या समस्येसह उपचारासाठी आलेल्या 100 लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. यापैकी ४४ टक्के पुरुष आणि ५५ टक्के महिला होत्या.

या रुग्णांना इंटरनेटचे व्यसन असल्याचे अभ्यासात आढळून आले. ७१ टक्के लोकांनी स्मार्ट फोनवर तासनतास इंटरनेटचा वापर केला. केवळ नऊ टक्के लोकांनी महत्त्वाच्या कामासाठी इंटरनेटचा वापर केला आणि 20 टक्के लोकांनी इंटरनेटचा वापर कधी गरजेच्या वेळी तर कधी अनावश्यकपणे केला. 72 टक्के लोक सोशल मीडियावर दिवसाचे पाच ते 12 तास घालवतात. अभ्यासात समाविष्ट असलेल्या रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण 18 ते 33 वर्षे वयोगटातील होते.

काय होतात परिणाम?

सोशल मीडियाचा वापर करता आला नाही तर अस्वस्थ होणे, कामावरून लक्ष विचलित होणे. सातत्याने सोशल मीडियावर असण्याने नातेसंबंधांवर, कामावर, अभ्यासावर परिणाम होणे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या भावनांची देवाण-घेवाण होते. सोशल मीडियामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे.

सोशल मीडियाचे व्यसन हा जरी मानसिक आजार मानला जात नसला, तरी इंटरनेट हा व्यसनाचाच एक भाग आहे. सगळ्याच वयोगटांतून सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT