Baramati Loksabha  sakal
लोकसभा २०२४

Baramati Loksabha Constituency : बारामती मतदारसंघात ५१ अर्ज दाखल ; आज छाननी

राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली.

सकाळ वृत्तसेवा

राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात एकूण ५१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उद्या (शनिवारी) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. २२) आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी बारामती लोकसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बारामती मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांनी, तर महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तसेच दोन्ही पक्षांकडून खबरदारीचा उपाय म्हणून डमी (पर्यायी) उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

यांसह इतर ४९ अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. छाननीनंतर अंतिम उमेदवारीची यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता. १९) सुरुवात झाली. या तीनही मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिलपर्यंत आहे. आतापर्यंत पुणे मतदारसंघातून पाच उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT