Loksabha Election Voting sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Voting : पूर्व विदर्भात ५६ टक्के मतदान ; देशात साठ टक्के मतदानाची नोंद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत उन्हाचा कडाका असतानाही उत्साहात मतदान पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत उन्हाचा कडाका असतानाही उत्साहात मतदान पार पडले. या सर्वच ठिकाणांवर सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि काही ठिकाणी यंत्रे बंद वा त्यात बिघाड होण्याचे प्रकार वगळता सर्वत्र सुरळीत प्रक्रिया पार पडली.

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, महाविकास आघाडीचे विकास ठाकरे, ‘बसपा’चे योगेश लांजेवार यांच्यासह २६, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, महायुतीचे राजू पारवे, ‘वंचित’चे किशोर गजभिये, ‘बसपा’चे संदीप मेश्राम यांच्यासह २८ उमेदवारांचे भाग्य यंत्रामध्ये बंद झाले. नागपुरात सरासरी ५१ टक्के तर रामटेकमध्ये ५२ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. रामटेकमध्ये चुरशीचा सामना असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी मोठी ताकद लावली होती. त्यानंतरही अपेक्षित मतदान झाले नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सायंकाळपर्यंत २ हजार १३३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. दिवसभर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाल्याने अंदाजे ६५ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

उन्हाची तीव्रता बघून सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, मांडव आणि आरोग्य सुविधा ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. आज सकाळपासून मतदानाला संथगतीने सुरवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत ३४.५६ टक्के आणि दुपारी तीनपर्यंत ४५.८८ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ पर्यंत ५६.८७ टक्के मतदान झाले असून सायंकाळी काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.

चंद्रपुरात सरासरी ६३ टक्के

चंद्रपूर मतदारसंघात सरासरी ५५ टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. परंतु, उन्हाचा तडाखा व विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली नाही. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे वगळण्यात आली होती. तर काही ठिकाणी मृतांची नावे यादीत असल्याने गोंधळ उडाला होता. अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ६६ टक्के मतदानाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर; जगभरातील १४ एकांकिकांचे सादरीकरण एकाच रंगमंचावर

मोठी बातमी! बोर्डाच्या पेपरची आता ऑनलाइन तपासणी; उत्तरपत्रिका तपासणीसाठी ‘एआय’ची घेतली जाणार मदत; पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी, वाचा...

Pune News : पुणे महापालिकेत पदोन्नतीवरून प्रशासनावर दुजाभावाचा आरोप, आयुक्तांचा खुलासा

Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' फक्त प्रियकर-प्रेयसीसाठी नव्हे, तर कुटुंब अन् मित्रांवरही प्रेम व्यक्त करण्याचा सण!

Valentine Day 2026 Special Recipe: व्हॅलेंटाईन डे ला सकाळी नाश्त्यात पार्टनरसाठी बनवा 'हार्ट शेप सँडविच', नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT