Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांमध्ये एकूण ६६.९६ टक्के मतदान झाल्याची माहिती गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांमध्ये एकूण ६६.९६ टक्के मतदान झाल्याची माहिती गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील एकूण ९७ कोटी मतदारांपैकी आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांमध्ये ४५.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे.

उर्वरित टप्प्यांमध्ये अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार २०१९च्या तुलनेत १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात ३.६५ टक्के मतदान अधिक झाले.

मतदारांमध्ये मतदानाबद्दल जागृती, मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करणे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणे यावर आयोगाकडून भर देण्यात आला असून. निवडणूक आयोगाच्या वतीने विविध संस्था, समाजावर प्रभाव असणाऱ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटिंनी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

मतदानाचा वाढलेला टक्का हा संपूर्ण जगाला भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा आहे, असेही कुमार म्हणाले. मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस नसून लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करायला हवे.

- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT