Aam Aadmi Party MP Sanjay Singh  esakal
लोकसभा २०२४

छत्रपती शिवराय आदिल शहासमोर कधीच झुकले नाहीत, पण उदयनराजे अमित शहांपुढे झुकले; आप खासदाराची घणाघाती टीका

छत्रपती शिवाजी महाराज आदिल शहाच्या समोर कधीही झुकले नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

''शरद पवार ८४ वर्षांचे आहेत; परंतु परिश्रम, मेहनतीने ते नरेंद्र मोदींच्या तानाशाहीच्या विरोधात लढत आहेत.''

सातारा : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आदिल शहाच्या समोर कधीही झुकले नाहीत; परंतु उदयनराजे अमित शहांच्या पुढे झुकले. तिकिटासाठी पाच दिवस त्यांना भेटू शकले नाहीत. छत्रपतींचा एक संदेश आहे, गद्दारांना माफी नाही. त्यामुळे छत्रपतींच्या भूमीतून सांगतो बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांचा (Sharad Pawar) पक्ष चोरणाऱ्यांना हरवायचे काम करा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केले.

शशिकांत शिंदे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. संजय सिंह म्हणाले, ‘‘सभेतील एवढी संख्या पाहून नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) कळाले आहे, की शशिकांत शिंदे जिंकून येत आहेत. एकीकडे शशिकांत शिंदे आहेत जे तुम्हाला मचांवरून नमन करतात आणि दुसरीकडे उदयनराजे आहेत, जे सांगतात मला नमस्कार करा. कोणाला साथ देणार याचा निर्णय घ्या.

शरद पवार ८४ वर्षांचे आहेत; परंतु परिश्रम, मेहनतीने ते नरेंद्र मोदींच्या तानाशाहीच्या विरोधात लढत आहेत. त्यांना प्रधानमंत्री भटकंती आत्मा म्हणतायत. त्यांच्या मरणाचा इच्छा ठेवतात. महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या नेत्याच्या अपमानाचे उत्तर द्यायचे आहे. साताऱ्यातील सभेतील संख्या बघून सांगतो, शरद पवार आपल्या साथीने नरेंद्र मोदींची राजनीती गाडून टाकण्याचे काम करणार आहेत. मराठा लढण्यात विश्वास ठेवतो, झुकण्यात नाही. गद्दारी करणाऱ्याला क्षमा करत नाही. महाराष्ट्राच्या, देशाच्या स्वाभिमानासाठी ८४ वर्षांच्या योद्धा लढतोय, कामगारांचा नेता आपल्यासाठी मैदानात उभा आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. गद्दारांना धडा शिकवा.’’

संजय सिंह म्हणाले

  • छत्रपती शिवाजी महाराज आदिल शहाच्या समोर कधीही झुकले नाहीत

  • उदयनराजे तिकिटासाठी अमित शहाच्या पुढे झुकले

  • छत्रपतींचा एक संदेश आहे, गद्दारांना माफी नाही

  • मराठा लढण्यात विश्वास ठेवतो, झुकण्यात नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT