UP CM Yogi Adityanath
UP CM Yogi Adityanath  
लोकसभा २०२४

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

संतोष कानडे

Lok sabha election 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. राम आणि कृष्णाच्या धरतीवर हे लोक गोहत्येला परवानगी देऊ इच्छित आहेत. परंतु आता काशी आणि अयोध्येनंतर आम्ही मथुरेकडे प्रस्थान केलं आहे.

फिरोजाबाद लोकसभेच्या जागेसाठी भाजप उमेदवार ठाकूर विश्वदीप सिंह हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'च्या लोकांना वाटतंय की राम आणि कृष्ण झालेच नाहीत. ते म्हणाले की, एकीकडे मोदी सरकार देशातल्या ८० कोटी लोकांना मोफत राशन देत आहे तर काँग्रेसच्या काळात काही लोक गरीबांचं राशन खात होते.

ते पुढे म्हणाले, आम्ही काशी आणि अयोध्येनंतर मथुराकडे प्रस्थान केलं आहे. त्यांनी समाजवादी पार्टीला टार्गेट करत म्हटलं की, त्यांनी कधी ब्रज भागाच्या विकासासाठी काही केलं? यादवांमध्येही केवळ आपल्या परिवाराला लाभ दिला, असा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांच्या मंगळसूत्राच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. ते म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा आणि मंगळसूत्राचा काय संबंध?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT