Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Sharad Pawar: नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना त्रास झाल्याचे पवार म्हणालेय

Sandip Kapde

Sharad Pawar: बारामती लोकसभा निवडणुकानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला, सभा देखील झाल्या मात्र यात अजित पवार कुठेच दिसले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज नाशिक येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर माहिती दिली. 

अजित पवार आजारी असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने होते. प्रचाराच एकमेकांवर टीका देखील करण्यात आली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रीया सुळे, अशी लढत बारामतीत होती. ७ तारखेला मदतान देखील झाले. तेव्हापासून अजित पवार बाहेर पडले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

शरद पवार यांनी राज ठाकरे यांना देखील टोला लगावला. शरद पवार यांनी आधी पक्ष फोडले आता त्यांचा पक्ष फुटला असे राज ठाकरे सभेत म्हणाले होते. यावर शरद पवार त्यांना टोला लगावला.  राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहित नाही. मी असं एकलं नाशिक हा त्यांचा बेस आहे. मात्र ते इथं हल्ली दिसत नसल्याचे पवार म्हणाले. 

बारामतीमधील मतदानानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार आम्हाला संपवायचे आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर भाजप आणि अजित पवार असा सामना रंगला होता. चंद्रकांत पाटील यांना बारामती प्रचारापासून देखील दूर ठेवण्यात आले होते. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना त्रास झाल्याचे पवार म्हणाले. आत्मविश्वास संपल्यामुळे ते जाती-धर्मावर बोलत असल्याचे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढील वर्षीच्या जत्रेपूर्वी मरू दे..'; दानपेटीत आढळलेल्या 100 रुपयांच्या नोटेवरील मजकूराने खळबळ, कोणी लिहिलं असं?

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summer Fruit Shopping Tips: गोड की केमिकल? कलिंगड खरेदी करताना ‘या’ 5 टिप्स नक्की तपासा

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

SCROLL FOR NEXT