Pune Loksabha Voting  sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha Voting : ‘वोट कर पुणेकर’ ट्रेंडिंगमध्ये

प्रथमच बोटावर लागलेल्या मतदानाच्या शाईचा आनंद तर कुठे सहकुटुंब मतदान केल्याची आठवण... पुणेकरांनी प्रत्यक्ष मतदानाबरोबरच समाजमाध्यमांवर विधायक पोस्ट करत लोकशाहीचा उत्सव साजरा केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: प्रथमच बोटावर लागलेल्या मतदानाच्या शाईचा आनंद तर कुठे सहकुटुंब मतदान केल्याची आठवण... पुणेकरांनी प्रत्यक्ष मतदानाबरोबरच समाजमाध्यमांवर विधायक पोस्ट करत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. समाजमाध्यमांवर जवळपास प्रत्येकानेच मतदानाचे आव्हान केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ‘वोट कर पुणेकर’ हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये पाहायला मिळाला.

सोमवारी सकाळपासूनच पुणेकरांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. तेव्हापासूनच समाज माध्यमांवर ‘पुणे लोकसभा’, ‘वोट कर पुणेकर’, ‘पुणेकर’ आदी हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये होते. युवा वर्गाने मतदानानंतर समाजमाध्यमावर हमखास पोस्ट केली आहे.

ज्यामध्ये बोटाला लागलेली शाई किंवा कुटुंबासोबत असलेला फोटो ‘शेअर’ केला आहे. त्याचवेळी पुणेकरांना मतदानाचे आवाहनही करण्यात आले. शहरातील कलाकार, राजकीय नेते, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आदींनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. एकीकडे मतदानाचा आनंद होता तर दुसरीकडे मतदार यादीत नाव नसल्याचा संतापही अनेकांनी व्यक्त केला आहे.

मीम्सचा पाऊस..

‘वसंत काय खाणार, धंगेकरांची मते’, ‘पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर’, ‘काय म्हणतात पुणेकर, निवडून येणार धंगेकर’ अशा मीम्सचाही पाऊस समाज माध्यमांवर पाहायला मिळाला. तीनही उमेदवारांचे समर्थन आणि मिश्कीलपणे टिप्पणी करणाऱ्या पोस्टनी अक्षरशः धुमाकूळ घातला होताच तर दुसरीकडे ‘दुपारी एक ते चार मतदान सुरू आहे’ अशा पुणेरी पाट्याही समाजमाध्यमांवर पाहायला मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT