Amravati Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

Amravati Lok Sabha 2024: लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच; भाजपने उमेदवारी दिल्या नवनीत राणा काय म्हणाल्या?

Amravati Lok Sabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Sandip Kapde

Amravati Lok Sabha 2024:  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. ते सध्या या जागेवरून खासदार आहेत. नवनीत राणा कमळावर लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपने उमेदवारी दिल्यावर नवनीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच. अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या 12 ते 13 वर्षापासून काम करत होती. मी कोणत्या पक्षाकडून लढावे हे मी अमरावतीकरांच्या डोळ्यात नेहमी पाहिले आहे. देशाचे प्रधामंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना मी माझे नेता मानते. नेत्यांनी ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विजयी होऊन नवनीत राणा संसदेत पोहोचल्या होत्या. महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी 36,951 मतांनी विजय मिळवला होता. (Latest Marathi News)

नवनीत राणा यांनी लग्नानंतरच राजकारणात आपली कारकीर्द सुरू केली. लग्नाच्या तीन वर्षानंतर तिने 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्या जिंकू शकल्या नाहीत, परंतु त्यानंतर नवनीत यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि विजयी होऊन अमरावतीमधून खासदार झाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या पंटरचा व्हिडीओ; सुरेश धस, आव्हाड, बांगर यांना घाणेरड्या शिव्या

UPI Service: महत्त्वाची बातमी! २२ जुलैला 'या' बँकेची यूपीआय सेवा बंद राहणार, सोशल मीडियावर ट्विट करत दिली माहिती

धक्कादायक! अलख निरंजन म्हणत 'हा' ढोंगी बाबा भक्तांना पाजायचा मूत्र, महिलांशी करायचा अश्लील चाळे; चपलेचाही द्यायचा वास

R Ashwin Video: तू माझ्यावर जळत असशील, तर...; हरभजन सिंगशी बोलताना अश्विन नेमकं काय म्हणाला?

'ऑनर किलिंग'नं मधुबनी हादरलं! उच्च जातीच्या मुलीशी प्रेमविवाह केला म्हणून तरुणाच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT