Manoj Jarange  sakal
लोकसभा २०२४

Manoj Jarange : अपक्ष उमेदवारही देणार नाही ; जरांगेंची घोषणा, निवडणुकीच्या मैदानातून माघार

‘‘लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही, शिवाय मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, कोणाचाही प्रचार करणार नाही,’

सकाळ वृत्तसेवा

अंतरवाली सराटी (जि. जालना) : ‘‘लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही, शिवाय मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, कोणाचाही प्रचार करणार नाही,’’ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी येथे शनिवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत केली.

मध्यंतरी जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात समाजातील सक्षम व्यक्तीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे करावे असे आवाहन केले होते. जरांगे म्हणाले, ‘‘निवडणुकीबाबत समाजबांधवांचे मत जाणून घेण्यासाठी अहवाल घेतला. परंतु, आता या बाबत वेळ कमी आहे.

गावा-गावांत न जाता ठराविक ठिकाणी, एकाच जागेवर बसून अहवाल तयार करण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये समाजाचा निर्णय पूर्ण आलेला नाही. यामुळे समाजाचे नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केल्यास धोका होऊ शकतो. म्हणून अपक्ष उमेदवार देणार नाही. मीसुद्धा निवडणूक लढणार नाही, कोणाच्या प्रचाराला जाणार नाही. ज्यांनी आरक्षणाकरिता मदत केली त्यांच्या पाठीशी राहा. ज्यांना पाडायचे त्यांना पाडा.’’ बैठकीस समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील ३६ लोकसभा मतदारसंघाचे अहवाल यावेळी जरांगे यांना देण्यात आले.

विधानसभेत ताकद दाखवणार

‘‘सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे लेखी देतील त्यांच्या बाबतीत निवडणुकीत विचार केला जाईल. विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू. त्यासाठी तयारीला लागा. आचारसंहिता संपल्यावर विराट सभा घेऊ, त्यासाठी लवकरच राज्याचा दौरा करणार आहे’’, असेही जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT