Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : देशहितासाठी एकत्र या;मुंबईतील सभेतून महाविकास आघाडीचे आवाहन

‘लोकशाही, राज्यघटना, देशहित आणि महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज केले. मोदी केवळ खोटे बोलण्याची गॅरंटी देऊ शकतात, अशी टीका करत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘लोकशाही, राज्यघटना, देशहित आणि महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज केले. मोदी केवळ खोटे बोलण्याची गॅरंटी देऊ शकतात, अशी टीका करत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.

पुन्हा सत्ता मिळाल्यास ‘वन नेशन, वन लीडर’च्या दिशेने देशाला घेऊन जाण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, ‘हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे थेट आव्हान देत मोदी यांच्यावर उलटवार केला.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार उद्या (ता. १८) संपणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘नकली संतान’ असा करत, अवहेलना केली. या अपमानाचा बदला महाराष्ट्राने महाविकास आघाडीला भरघोस मतदान करून घ्यावा,’’

असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बदललेल्या चिन्हांविषयी लोकाना पुरेशी माहिती नसल्याबद्दल केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली.

‘तुतारी’ आणि ‘मशाल’ चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवा आणि याच बदललेल्या चिन्हांवर मतदान करा असे केजरीवाल यांनी सांगितले. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी हे सर्व नेते तुरुंगात जाणार असल्याची भीती देखील केजरीवाल यांनी व्यक्त केली. ‘भाजपला २०० पेक्षा अधिक जागा मिळणार नसून ‘इंडिया’ आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत,’’ असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ‘‘मोदी केवळ खोटे बोलण्याची गॅरंटी देतात,’’ असा घणाघातही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय व प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु भारताची जनता रशिया, बांगलादेश, पाकिस्तानसारखी परिस्थिती येथे होऊ देणार नाही. डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान अबाधित ठेवू.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष

तुम्ही आमच्यावर टीका केली. महाराष्ट्रात कुणी तरी भटकती आत्मा आहे, असे म्हणालात. यानिमित्ताने एवढेच सांगतो, ‘हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची आमची ताकद आहे.’

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

केजरीवाल म्हणाले...

  • देशाला वाचविण्यासाठी तुमच्याकडे भीक मागायला आलो

  • भाजपला देशातील लोकशाही संपवायची आहे

  • आम्ही लोकशाही तुरुंगातून चालवून दाखवू

  • खोट्या केस टाकून ‘आप’च्या नेत्यांना अटक

  • तुरुंगामध्ये पंधरा दिवस माझी औषधे बंद केली

  • मोफत वीज दिल्याने मला अटक करण्यात आली

  • मी तुरुंगात जाणार की नाही हे तुमच्या हातामध्ये

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • पंतप्रधान मोदींचे राजकारण महाराष्ट्र गाडेल

  • महाराष्ट्र अंबानींना देणार नाही

  • महायुतीच्या सभेमध्ये गद्दार आणि भाडोत्री

  • असली-नकली ठरविणारे तुम्ही कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT