atal bihari vajpayee bihar tarapur esakal
लोकसभा २०२४

Atal Bihari Vajpayee: किस्से निवडणुकीचे! सभेला गर्दी नसल्यामुळे अटलजी स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले

Atal Bihari Vajpayee: अटलीजींनी कार्यकर्त्यांना व्यासपीठाची तयारी करण्यास सांगितले आणि ते लोकांना बोलवण्यासाठी मैदानात उतरले.

Sandip Kapde

Atal Bihari Vajpayee:

लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या जोरात सभा सुरु आहेत. अनेक सभांना गर्दी असते तर काही सभा रिकाम्या असतात...मात्र अशी एक रिकामी सभा पाहून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संतापले होते...पण ते संयमी देखील होते...कुणावर आरडाओरड न करता...ते प्रचारासाठी स्वत: मैदानात उतरले... हा किस्सा आहे.. १९७२ मधील...

राज्य बिहार, जिल्हा मुंगेर, गाव तारापूर...येथे १९७२ मध्ये अधिवक्ता जयकिशोरसिंह निवडणुकीच्या मैदानात होते. यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. अटलजी सभास्थळी पोहचले पण कार्यकर्त्यांची तयारी पाहून योग्य प्रचार झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अटलीजींनी कार्यकर्त्यांना व्यासपीठाची तयारी करण्यास सांगितले आणि ते लोकांना बोलवण्यासाठी मैदानात उतरले. अटलजी एका कार्यकर्त्यांवा घेऊन बाजारात गेले. त्यांनी एक माईक विकत घेतला आणि एक रिक्षा भाड्याने घेतली.

वाजपेयी यांनी रिक्षावर माईक बांधला आणि डोक्यावर गमछा बांधला. तारापूर शहरात अटलजी फिरले. यावेळी ते माईकवरुन लोकांना आवाहन करत होते. हळू हळू सभास्थळी गर्दी जमू लागली. त्यांनंतर वाजपेयी भाषणासाठी मंचावर आले तेव्हा लोकांना समजले की रिक्षातून प्रचार करणारी व्यक्ती म्हणजे वाजपेयीच होते.

या गोष्टीला ५२ वर्ष पूर्ण  झाले. पण स्वतःच्या सभेचा प्रचार स्वतःच रिक्षातून करण्याची अटलजींच्या कल्पनेची आजही लोकांना गंमत वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT