Vinod Patil_Eknath Shinde
Vinod Patil_Eknath Shinde 
लोकसभा २०२४

Vinod Patil: विनोद पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये झाली 40 मिनिटं चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण इथून मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटील हे देखील इच्छुक असल्याची चर्चा होती. पण अद्याप विनोद पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी टेन्शनमध्ये असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं विनोद पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल ४५ मिनिटं चर्चा झाली. यानंतर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केलं. (40 minute discussion was held between Vinod Patil and CM Eknath Shinde what exactly happened in meeting)

विनोद पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री ही फार मोठी ताकद आहे, माझ्यासारख्या किरकोळ कार्यकर्ते त्यांचा काय फायदा करु शकतात. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी सर्वांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका मी जाहीर करणार आहे. माझी भूमिका कोणालातरी विरोधाची असेल असं नाही. कारण जो विकास करेल आणि लोकांना वाटेल हा आपला उमेदवार आहे, त्याच्यासोबत मी राहिलं" (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्र्यांशी तब्बल ४५ मिनिटं चर्चा झाल्यानंतर यावर बोलताना विनोद पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांना उन-वाऱ्याची चर्चा करण्यासाठी हवामान खातं आहे. त्यांना माझ्यासारख्याची गरज नाही, त्यांनी कौतुकानं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी, नगरसेवकांशी चर्चा केली. (Latest Marathi News)

पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जर आमच्यामध्ये राजकीय चर्चा झाली असती तर मला आनंद झाला असता, तसंच काही ठरलं असतं तर मी त्यांनाच सांगितलं असतं की तुम्हीच ते सांगा. पण माझ्या वागण्यात तुम्हाला तसं काहीही दिसत नसेल. माझ्या घरी मुख्यमंत्री येतात याचा मला आनंद आहे. काल मी पत्रकार परिषद घेतली त्यात मी सांगितलं की मी नाराज नाही आणि खूषही नाही. त्यामुळं माझ्यामुळं कोणी पडेल तर त्याचा डाग माझ्यावर लावायचा नाही, असंही विनोद पाटील यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT