लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला? बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावावर एकमत

सकाळ वृत्तसेवा

विरार : पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच बहुजन विकास आघाडीत सहा जणांनी उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे श्रेष्टी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, इच्छुकांनी एकत्र येत एकमताने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता फक्त राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा होणे बाकी राहिले आहे.

पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाच्या भरती कामडी यांचे नाव जाहीर झाले आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा कोणाला जाणार याचा तिढा सुटलेला नाही. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचं बळ असल्याने आणि त्यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. केल्याने बहुजन कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगू लागली होती.

उमेदवारीसाठी बहुजन विकास आघाडीमधून ६ नावे चर्चेत होती. त्यामध्ये माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री मनिषा निमकर, वाडा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बुकले, जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव, बोईसरचे आमदार राजेश पाटील व पांडुरंग गोवारी यांची नावे चर्चेत होती.

वरिष्ठांनी एकत्र येत चर्चा केल्यावर एकमताने राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तशी शिफारस हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली असल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना संगितले. हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीने मला खूप काही दिले आहे, आता तरुणांना संधी द्यावी म्हणून मी आणि इतरांनी राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याचे जाधव यांनी सांगितले. इच्छुकांनी एकमताने राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली असली तरी उमेदवारांची घोषणा हितेंद्र ठाकूर उद्या करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राजेश पाटील यांची राजकीय कारकीर्द

राजेश पाटील यांच्या घरातूनच त्यांना राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे आजोबा हिराजी पाटील हे वसई पंचायत समितीचे उपसभापती राहिले होते. तर राजेश पाटील यांनी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषद सदस्य, वसई पंचायत समिती सभापती व आता बोईसरचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi cabinet: राज्यसभा तिकिटांनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल? चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांची चर्चा... कुणाला संधी?

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली, लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू

अधिकाराचा गैरवापर करत कैद्याची सुटका, बदल्यात पत्नीशी संबंध ठेवले; उपमहानिरीक्षकाला अटक; पोलीस दलात खळबळ

Marathi News Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाय९१ची सेवा सुरू

SCROLL FOR NEXT