Lok Sabha Poll 2024  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Poll 2024 : कात्रजसह आजूबाजूच्या परिसरात शांततेत मतदान

लोकसभेसाठी होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानास सकाळपासुन सुरवात झाल्यानंतर शांततेत मतदान पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : लोकसभेसाठी होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानास सकाळपासुन सुरवात झाल्यानंतर शांततेत मतदान पार पडले. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या भिलारेवाडी, मांगडेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान करण्याची सोय करण्यात आली होती.

त्याचबरोबर, येवलेवाडीतही मतदान झाले. दुपारी ऊन जास्त जाणवत असल्यामुळे सकाळी लवकर मतदान करण्याकडे नागरिकांचा कल होता. तशा मतदान केंद्रावर रांगाही लागलेल्या दिसून आल्या. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.

त्याचबरोबर, सुखसागरनगरमधील राजीवगांधीनगर, भारती विद्यापीठ परिसरातही मतदान झाले. लेकटाऊन सोसायटीतील अमित भंडारे हे जर्मनीस्थित व्यक्तीने खास मतदानासाठी परदेशातून येत मतदान केल्याने चांगलीच चर्चा झाली. यावेळी मतदान करुन त्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन सोसायटीच्या वतीने स्वागतही करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT