Beed Loksabha election 2024 esakal
लोकसभा २०२४

Beed Loksabha election 2024 : बीडमध्ये 'वंचित'चा उमेदवार जाहीर; मग ज्योती मेटेंचं काय? तीन-तीन मराठा उमेदवारांमागे कुणाची खेळी?

बीडच्या राजकारणात मराठा-वंजारी फॅक्टर कायम ध्यानात घेतला जातो. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यावेळी मराठा एक झाला, आता बदल होईल, असं बोललं गेलं. परंतु प्रितम मुंडे यांचाच विजय झाला. एकगठ्ठा वंजारी वोटिंग ही मुंडेंची जमेची बाजू आहे.

संतोष कानडे

Pankaja Munde beed loksabha : बीडमध्ये शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली अन् सगळीच राजकीय परिस्थिती बदलून गेली. सोनवणेंच्या उमेदवारीमुळे पंकजांचा विजय सोपा झाल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण बजरंग सोनवणे हे दुसरे-तिसरे कोणी नसून धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. उमेदवारी मिळण्याच्या काहीच दिवस अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने रविवारी अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक हिंगे हे बीडमधील मराठा चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आहेत.

मराठा आरक्षण चळवळीचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीड लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु चर्चा कुठे फिस्कटली कळलं नाही अन् पवारांनी बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योती मेटेंना वंचितचा पाठिंबा मिळेल, असं बोललं जात होतं.

रविवारी वंचितनेही अशोक हिंगेंच्या रुपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढतील, असं बोललं जात आहेत. कारण त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 'शेंडी तुटो वा पारंबी.. आता माघार नाही' अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवलेली आहे. शिवाय शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचीही हीच मागणी आहे.

मराठा-वंजारी फॅक्टर

बीडच्या राजकारणात मराठा-वंजारी फॅक्टर कायम ध्यानात घेतला जातो. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यावेळी मराठा एक झाला, आता बदल होईल, असं बोललं गेलं. परंतु प्रितम मुंडे यांचाच विजय झाला. एकगठ्ठा वंजारी वोटिंग ही मुंडेंची जमेची बाजू आहे. त्यात आता धनंजय मुंडे सोबतीला असल्याने पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी झालीय. काहीही म्हटलं तरी बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत.

मराठा मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी?

मराठा आरक्षण चळवळ आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव; यामुळे बीड, मराठवाडा आणि पर्यायाने महाराष्ट्रात मराठा समाज एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

बीडमध्ये बजरंग सोनवणे, अशोक हिंगे आणि संभाव्य उमेदवार ज्योती मेटे यांच्यामुळे तीन-तीन मराठा उमेदवार रिंगणात असतील. यामागे नेमकी खेळी कुणाची? असा प्रश्न बीडकारंच्या मनात उपस्थित होतोय.

असं झालं तर मराठा मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. जे प्रत्येक निवडणुकांमध्ये होत तेच यावेळी होत आहे. मोठ्या खुबिने मराठा मतं फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तीन मराठा उमेदवार विरुद्ध एक वंजारी उमेदवार आणि तोही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा. त्यातही धनंजय आणि पंकजा मुंडे एकत्र; त्यामुळे सध्यातरी पंकजांचं पारड जड आहे. उद्या ज्योती मेटे रिंगणात उतरल्या आणि संभाव्य मराठा लाट उसळली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही, हेही तितकंच खरं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT