Congress leader Satej Patil esakal
लोकसभा २०२४

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलंच नव्हतं, विशाल पाटीलच काँग्रेसचे उमेदवार असतील; सतेज पाटलांनी केलं स्पष्ट

शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची जागा घेतली.

सकाळ डिजिटल टीम

सांगली लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती काँग्रेस सोडणार नाही. हा विषय आता दिल्ली दरबारी गेला आहे.

सांगली : ‘‘कोल्हापूरची जागा काँग्रेसला (Congress) देऊन सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता,’’ असे माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. हा त्यांचा निर्णय आहे. सांगलीत काँग्रेस लढणार आहे. विशाल पाटीलच (Vishal Patil) उमेदवार असतील आणि ते निवडून येतील, असेदेखील त्यांनी ठणकावून सांगितले.

कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे. शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची जागा घेतली. महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही जागा घेतली. मात्र, या जागेच्या बदल्यात सांगलीतील काँग्रेसची जागा देण्याचा विषय झाला नव्हता. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढेल, दोन दिवसांत याचा निर्णय सकारात्मक होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तर, शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. याचा सर्वांना आनंद आहे. शिवाय वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले. राज्यात वंचित आघाडीचा निर्णय झाला नाही, त्यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे, अशी इच्छा असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

हातकणंगलेची जागा ही शिवसेनेची आहे. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. माजी खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे. शेट्टी यांचा निर्णय दोन दिवसांत होण्याची अपेक्षा आहे.

सांगलीचा निर्णय मंगळवारी दिल्लीत

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने २३ हून अधिक जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप रखडत चालले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती काँग्रेस सोडणार नाही. हा विषय आता दिल्ली दरबारी गेला आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गेदेखील विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर सकारात्मक आहेत. यावर मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत सांगलीचा निर्णय मार्गी लागेल. आमदार विश्वजित कदम यांनी श्री. खर्गे यांच्याशी आज चर्चा केली. विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी रमेश चन्नीथल यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Video: 'तो' व्हिडीओ AI जनरेटेड? नितीश कुमार कुठे गायब झाले? 58 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Vaibhav Sooryavanshi: वैभव मला सर डॉन ब्रॅडमन यांची आठवण करू देतो, त्याची शैली अगदी त्यांच्यासारखीच; दिग्गज खेळाडूचा दावा

Live Marathi News Update : SFI च्या सह-सचिव आयशी घोष यांच्या विरोधात यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

Parliament News: १२-१२ तास काम करूनही बोलायला ३ मिनिटंच देताय; भडकलेले खासदार सभापतींना म्हणाले, तुम्ही १ दिवसाचे मुख्यमंत्री होतात...

Infosys News: फ्रान्सने इन्फोसिसवर ठोठावला 2 कोटींचा दंड! कामाच्या तासांमुळे कंपनी अडचणीत; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT