Amit Shah eSakal
लोकसभा २०२४

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

अमित शहा सभेला उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे. इंडियाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे तुम्ही मला सांगू शकाल का? ते कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येणार नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

Bihar Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळाली तर घटकपक्षांना क्रमाक्रमाने पंतप्रधानपदाची खुर्ची देण्याचे नियोजन या आघाडीकडून केले जात आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. बिहारमधील मधुबनीत प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. देशाला सशक्त नेत्याची गरज असून वार्षिक तत्त्वावर अशा नेत्याच्या नियुक्तीची आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी मारला.

अमित शहा सभेला उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे. इंडियाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे तुम्ही मला सांगू शकाल का? ते कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येणार नाहीत. मात्र, जरी इंडिया आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार, ममता बॅनर्जी, एम.के.स्टॅलिन की लालूप्रसाद यादव? असा सवालही त्यांनी केला.

ते म्हणाले, ‘‘त्यांनी पंतप्रधानांची खुर्ची आपापसांत फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. देश चालविणे म्हणजे एखादे किराणा मालाचे दुकान चालविण्यासारखे नाही. जर कोरोना साथीसारखी परिस्थिती पुन्हा उद्‌भवली तर इंडियाचे नेते देशाला वाचवू शकतील का, ते देशाला दहशतवाद्यांपासून संरक्षण देऊ शकतील का, आपल्या देशाला सशक्त पंतप्रधानपदाची गरज असून वार्षिक तत्त्वावरील पंतप्रधानाची आवश्यकता नाही.’’

''PFI वर बंदी कारण...''

बिहारच्या उत्तर भागात पूर्वी झालेल्या गुरांच्या तस्करीचा उल्लेख करत अमित शहा म्हणाले, की ‘एनडीए’ सरकार गोहत्येविरुद्ध आहे. आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत गोहत्या होऊ देणार नाही. पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता. या संघटनेला भारत इस्लामिक देश बनवायचा होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT