Tejaswi Yadav  esakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : मासे खातानाच्या व्हिडीओवरुन तेजस्वी यादवांना घेरण्याचा प्रयत्न; Video Viral

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : चैत्रातील नवरात्र सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मासे खात असतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून त्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. सोशल मीडियावरही अनेक नागरिकांनी तेजस्वी यांच्यावर टीका केली.

एरवी मांसाहार करणारे अनेक भाविक चैत्री नवरात्रात पूर्ण शाकाहार करतात. प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने प्रमुख नेत्यांची प्रचंड धावपळ होत असून या धावपळीतच त्यांना जेवावे लागते. तेजस्वी यादव हे सध्या विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांच्याबरोबर प्रचार करत आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या सभास्थानी हेलिकॉप्टरमधून जात असतानाच त्या दोघांनी जेवण केले. यावेळी तेजस्वी हे मासे खात असतानाच दिसत आहे. वेळापत्रक व्यग्र असल्याने अशा प्रकारे जेवण करावे लागत असल्याचे सांगतानाच तेजस्वी हे ताटातील तळलेले मासे कॅमेरासमोर आणत त्यांची माहिती सांगत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेजस्वी यांनी स्वत: हा व्हिडिओ मंगळवारी ‘एक्स’वर प्रसिद्ध केला.

यावरून, भाजपच्या नेत्यांनी आणि जनतेनेही तेजस्वी यांच्यावर टीका केली आहे. ‘‘तेजस्वी यादव हे सोईस्कर सनातनी आहेत. ते नेहमीच लांगुलचालनाचे राजकारण करतात. तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यांच्यामुळेच बिहारमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे,’’ अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी केली आहे. मागील वर्षीही श्रावण महिना सुरू असतानाच लालूप्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सामिष भोजनाची पार्टी ठेवली होती, असे भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी निदर्शनास आणून दिले.

‘व्हिडिओ एक दिवस आधीचा’

वाद झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी आरोपांची खिल्ली उडवत स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधीचा असल्याचे ते म्हणाले. ‘आम्हाला भाजपच्या समर्थकांची, गोदी मीडियाची आणि भक्तांची ‘आयक्यू’ चाचणी घ्यायची होती,’’ असा टोमणाही त्यांनी मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT