Rohit Pawar sakal
लोकसभा २०२४

Rohit Pawar : भाजपकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न ; रोहित पवार यांची टीका,अडचणीत आणण्यासाठी कुटुंबाचा वापर

‘‘भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शरद पवारांची कारकीर्द संपवायची आहे, असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शरद पवारांची कारकीर्द संपवायची आहे, असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे. आमच्याच कुटुंबातील लोकांचा वापर करून भाजप पवार यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे,’’ अशी टीका करत जनता पवार साहेबांबरोबर असल्याने सुप्रिया सुळे तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीमधून निवडून येतील,’’ असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘श्रीनिवास पाटील आजारी असल्याने साताऱ्यात दुसरा सक्षम उमेदवार दिला जाईल. त्याची घोषणा लवकरच करू. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबर यावे, अशी आमची इच्छा आहे. ते स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचा फायदा होईल. तसे ते करतील, असे वाटत नाही.’’ कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून गुंडांचा वापर करण्यात आला. तरीही रवींद्र धंगेकर निवडून आले. पैसा, गुंडांचा वापर करून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न भाजप व त्यांचे इतर मित्रपक्ष करत आहेत. धंगेकरांबरोबर सामान्य जनता असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

तटकरे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते

वयाने मी लहान असल्याने सुनील तटकरे मला बालवाडीचे अध्यक्ष म्हणत असतील. पण ते सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्की आहे. एका घराच्या पत्त्यावर शंभर कंपन्या कशा? भाजपबरोबर जाऊन स्वतःवरील कारवाया थांबवायच्या, हे त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

Asia Cup 2025: ना संजू, ना रिंकू... अजिंक्य राहणेनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या संघाला रोखणे अवघड

Sangli News:'मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबईत २९ ऑगस्टच्या मोर्चासाठी सांगलीत जिल्हाभर बैठका; मोठ्या संख्येने मुंबईला जाण्‍याचा निर्धार

Sangli News: ‘उरुण-ईश्वरपूर’ नामांतरप्रश्‍नी उपोषण स्थगित; सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून घोषणा, बदलाची मागणी

Akola Traffic: अकोल्यात ७७ बेशिस्त ऑटोरिक्षांवर धडक कारवाई; ९०,५०० रुपये दंड वसुल, १७ ऑटो डिटेन

SCROLL FOR NEXT