Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : भाजपचे ‘घर चलो अभियान’ ; दहा हजार कार्यकर्त्यांचा अडीच लाख मतदारांशी संवाद

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून खासदार, आमदारांसह कार्यकर्त्यांनी रविवारी ‘घर चलो अभियान’ राबविले. ‘विकसित भारतासाठी भाजपला मत द्या’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून खासदार, आमदारांसह कार्यकर्त्यांनी रविवारी ‘घर चलो अभियान’ राबविले. ‘विकसित भारतासाठी भाजपला मत द्या’, ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना निवडून द्या’, असे आवाहन करण्यात आले. भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांनी अडीच लाख मतदारांशी संपर्क साधला.

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हे अभियान सुरु आहे. रविवारी सकाळी साडे आठ वाजता १५० ते २०० कार्यकर्ते पक्षाच्या एरंडवणे येथील कार्यालयात जमले. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर अभियान सुरू झाले. घाटे यांनी दांडेकर पूल परिसरातून नागरिकांना भेटण्यास सुरवात केली. बावनकुळे सकाळी साडे दहा वाजता अभियानात सहभागी झाले. त्यांनी अप्पा बळवंत चौकाजवळील राधा-कृष्ण सोसायटीतील आठ ते दहा सदनिकांमधील रहिवाशांशी संवाद साधला.

पाटील यांनी सकाळी नऊ वाजता डहाणूकर कॉलनीमधील रहिवाशांशी संवाद साधला. त्यांनी दोन सत्रांत नागरिकांच्या गाठीभेटी घेत पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सकाळी नऊ वाजता डहाणूकर कॉलनी व वुडलॅंड सोसायटीत घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. मतदानाच्या दिवशी एक हजार ८८ सदनिकाधारकांशी संपर्क साधण्याची योजना त्यांनी आखली आहे. पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सकाळी दहा वाजता कोथरूडमधील लक्ष्मीनगर परिसरामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT