Govinda joins Shivsena 
लोकसभा २०२४

Govinda Joins ShivSena: अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळणार?

Govinda Joins ShivSena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Govinda Joins ShivSena Marathi News: अभिनेता गोविंदा यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर गोविंदा यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला.

गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशामागं लोकसभेची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा पंधरा वर्षानंतर गोविंदाची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

२०१० पासून २०१४ पर्यंत या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं आहे तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन हे मी सर्वांना अश्वस्थ करतो. जगात बॉलिवूडचे जे कलाकार चमकत आहेत त्या बॉलिवूडला जन्म देणारी ही भूमी आहे. (Marathi Tajya Batmya)

ही संतांची भूमी आहे, साहित्य आणि संस्कृतीला महत्व देणारी ही भूमी आहे. फिल्मसीटी जगात त्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. आम्ही सुरुवातीला जी मुंबई पहायचो ती आता जास्त सुंदर दिसते आहे. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत हवा, रस्ते, सौंदर्यात मोठी भर पडली आहे.

बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर चांगली कृपा होती. माझ्या आई-वडिलांपासून बाळासाहेब ठाकरेंशी आमचे चांगले संबंध होते. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षात मी अशा पद्धतीनं येईल याचा मी कधी विचार केला नव्हता. त्यामुळं आता शिवसेनेत आल्यानंतर मी प्रामाणिकपणे काम करेन, असंही गोविंदा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT