Loksabha Election Result sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : सुळेंच्या विजयाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष ; ‘गोविंदबागे’त गुलालाची उधळण

सुप्रिया सुळे यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ५० हजारांचे मताधिक्य मिळाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी माळेगावसह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : सुप्रिया सुळे यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ५० हजारांचे मताधिक्य मिळाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी माळेगावसह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली. माळेगावसह पणदरे, गोविंद बाग, शारदानगर आदी भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली.

‘सुप्रिया सुळे तुम आगे बडो..हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी नीरा-बारामती राज्यमार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. काही महिलांनीही ढोल- ताशाच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते अमित तावरे, गौरव जाधव, नितीन तावरे, भरत कदम, प्रताप सातपुते, वैभव वाघमोडे, श्रीहरी येळे, अमोल भोसले, वर्षा शिंदे, माया खोमणे, अंजली पोळ, मयूर भोसले, रूपेश भोसले, अर्चना पोळ आदी उपस्थित होते. नितीन तावरे यांनी लाडूंचे वाटप करत माळेगावकरांसह गोविंदबागेवर येणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

या अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत निकालाचा कल बदलू शकतो, या आशेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते होते. परंतु, शेवटपर्यंत सुप्रिया सुळे यांची मतांची आघाडी वाढत गेली आणि विरोधी कार्यकर्त्यांच्या आनंदावर पाणी पडले. त्यामुळे माळेगावातील अजित पवार गटाच्या मातब्बर नेते मंडळींनी आपल्या घरातूनच लोकसभेचा निकाल ऐकणे पसंत केले. तशीच परिस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेते मंडळींची झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते अमित तावरे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी लढत झाली असली, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असाच सामना बारामतीमध्ये मतदारांनी पाहिला. या चुरशीच्या निवडणुकीत सुरवातीपासूनच सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्याने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमालीचा वाढला आहे.’’भरत कदम म्हणाले, ‘‘सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी अकरा हजार मतांची आघाडी घेतली, त्याचवेळी विजयाची चाहूल आम्हाला लागली. अजित पवार हे पवारसाहेबांना सोडून भाजपबरोबर गेले, हे लोकांच्या पचनी पडले नाही, हेच सुळे यांच्या मताधिक्यावरून स्पष्ट होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT