Chandrakant Khaire esakal
लोकसभा २०२४

Chandrakant Khaire : ''माझ्या नशिबात लोकसभा आहे, मला ज्योतिषी म्हणाले..'', चंद्रकांत खैरेंचं दानवेंना प्रत्युत्तर

Loksabha Election 2024 : मागच्या वेळी माझ्या नशिबात लोकसभा होती, परंतु डावपेच आखून मला दूर ठेवलं गेलं. यावेळीही अनेक ज्योतिषी आणि पंडितांनी नशिबात लोकसभा असल्याचं सांगितलं आहे...

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मागच्या वेळी माझ्या नशिबात लोकसभा होती, परंतु डावपेच आखून मला दूर ठेवलं गेलं. यावेळीही अनेक ज्योतिषी आणि पंडितांनी नशिबात लोकसभा असल्याचं सांगितलं आहे. असं सांगत उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजी नगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

चंद्रकांत खैरेंमुळे दहा वर्षांपासून मी लोकसभेसाठी दूर राहिलो, यावेळी आपल्याला पक्षाने तिकिट द्यावं, अशी मागणी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय की, मी गुरु असून ते माझे शिष्य आहेत. गुरु काही डाव हातचे ठेवत असतात.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे

अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. ही मोठी पोस्ट आहे. त्यांनी लोकसभेला उभं राहू नये, असा सल्ला मी दिला नाही. परंतु पक्षाने यावेळी मला संधी द्यावी, अशी माझी मागणी आहे. मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, तुझ्या नशिबात असेल तर द्यावं लागेल अन् नशिबात नसेल नाही द्यावं लागणार.

''मागच्यावेळी माझ्या नशिबात लोकसभा होती, परंतु डावपेच आखून मला दूर ठेवलं गेलं. यावेळीही माझ्या नशिबात लोकसभा आहे. मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. मी अनेक ज्योतिषांकडे आणि पंडितांकडे चौकशी केली आहे. त्यांच्या मते माझ्या नशिबात लोकसभा आहे.'' असं खैरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, लोकांचीही हीच मागणी आहे, त्यामुळे मला खासदार व्हायचं आहे. इम्तियाज जलील यांनी काहीही काम केलेलं नाही. दिल्लीत जे मी काम केलं ते कुणीही करु शकत नाही. ते इथपर्यंत आलेही नसते, पण मी कुणाचं तोंड बंद करु शकत नाही.

''अंबादास दानवे हा माझा शिष्य आहे. पण गुरुही काहीना काही हातचं ठेवतात. आम्ही कुटुंबातले आहोत. उद्धवजी आमच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात.'' असं म्हणत खैरेंनी लोकसभा लढवण्याची तीव्र इच्छा बोलून दाखवली आहे.

खैरे मला डावलण्याचा प्रयत्न करतात- दानवे

''मला शिंदेंकडे जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. मी शिंदे गटात नाही, शिंदे गट पाच ते सहा महिने राहणार आहे. इच्छा व्यक्त करणे आपला अधिकार आहे. काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या आहेत. दुसरी बाजू मांडणं गरजेचं होतं. चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात. पण, मी उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. त्यामुळे खैरे काय करतात याबाबत मला देणंघेणं नाही.'' असं अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT