Eknath Shinde sakal
लोकसभा २०२४

Eknath Shinde : आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

‘‘सर्वसामान्य शिवसैनिकाला पालखीत बसविण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते, मात्र त्यांनी स्वतःच सत्तेच्या पालखीत उडी मारली. भाजपबरोबर शिवसेनेची नैसर्गिक युती होती. मात्र त्यांनी केलेला नवीन प्रयोग नैसर्गिक विचारसरणीच्या विरोधात होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘‘सर्वसामान्य शिवसैनिकाला पालखीत बसविण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते, मात्र त्यांनी स्वतःच सत्तेच्या पालखीत उडी मारली. भाजपबरोबर शिवसेनेची नैसर्गिक युती होती. मात्र त्यांनी केलेला नवीन प्रयोग नैसर्गिक विचारसरणीच्या विरोधात होता. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना वाचविण्यासाठी धाडसी निर्णय घेतला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामकरणाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? असा सवाल शिंदे यांनी ठाकरे यांना उद्देशून केला.

  • शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी जिल्हाप्रमुख व लोकसभा संघटक विजय करंजकर यांचा

  • प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री

  • म्हणाले, ‘‘ठाकरे कुटुंबीय नेहमी ‘किंग मेकर’च्या भूमिकेत राहिले. परंतु

  • उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा मोह झाला व त्यांनी अनैसर्गिक घटकांशी युती

  • केली.

मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घरात बसून व फेसबुकवरून काम केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करून मोठे पाप केले. सत्ता असतानाही शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. त्यामुळे स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. ५० आमदार आज माझ्याबरोबर आहे. शिवसेनेत अजूनही पदाधिकारी व कार्यकर्ते येत आहे. समोरची शिवसेना पूर्ण रिकामी झाली आहे. हे का होत आहे याचे आत्मपरीक्षण केल्यास गद्दार कोण हे समजेल. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत. त्यांच्या गद्दारीमुळेच त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला’’

‘‘आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, त्यावेळेस पळून गेलो नाही. फोनवर बोलत-बोलत गेलो. उद्धव ठाकरे यांना पाच भाजप नेत्यांना तुरुंगात टाकायचे होते व भाजपचे २५ आमदार फोडून महाविकास आघाडीत समाविष्ट करायचे होते. त्यावेळी आम्ही साथ सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे घरगडी समजतात. त्यांचा मान सन्मान राखला जात नाही.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, रामदास कदम, मनोहर जोशी या जनतेचे समर्थन असलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी संपविण्याचा प्रयत्न केला. कोणाला मोठे होऊ दिले नाही. म्हणून आज त्यांची अशी अवस्था झाली,’’ अशी शिंदे यांनी केली. नव्याने प्रवेश केलेल्या विजय करंजकर यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठेची चेष्टा होत असल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्र्यांच्या गोडसेंना कानपिचक्या

उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकाला मोठे होऊन दिले नाही. हाच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, ‘‘ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना विसरू नये, त्यांची कामे केली पाहिजे, कोणाचा अपमान होईल, अशी कामे होऊ नये. कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजे तोच तुमचा दुवा आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिलेला शब्द पाळल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT