Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : पाच मिनिटांच्या भाषणामुळे पत समजली ; मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी, ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करतात. पण ‘इंडिया’ आघाडीच्या रविवारच्या(ता.१७) भाषणात त्यांनी हिंदू शब्द उच्चारला नाही. यावरूनच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांची धोरणे, विचारधारा सोडून दिल्याचे दिसले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी, ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करतात. पण ‘इंडिया’ आघाडीच्या रविवारच्या(ता.१७) भाषणात त्यांनी हिंदू शब्द उच्चारला नाही. यावरूनच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांची धोरणे, विचारधारा सोडून दिल्याचे दिसले. यामुळेच आम्हाला त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी ठाकरे यांच्यावर आज केली. त्याचबरोबर ठाकरे भाषणासाठी अवघी पाच मिनिटे देण्यात आली, यावरून त्यांची पत दिसली, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

शिंदे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, या आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे का? तो नसल्याने सर्वजण एकमेकांकडे निराशेने पाहत होते. इतर राज्यांतून राजकीयदृष्ट्या तडीपार झालेली नेतेमंडळी एकत्र आली होती. मग, ते पंतप्रधान मोदी यांना कसे तडीपार करतील, असा सवालही त्यांनी केला. गेल्या ५० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते मोदी यांनी दहा वर्षांत करून दाखविले.

‘इंडिया’च्या सभेमधील सर्व पक्ष  विश्वास गमावलेले पक्ष असून ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमधून फक्त त्यांच्यामध्ये व्यक्तीद्वेष दिसून आला. शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ठाण्यामधील रोड शोला ५०० लोक सुद्धा नव्हते, असा टोमणाही मारला. मविआचे सरकार हे स्पीड ब्रेकर होते. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प रखडले. आता या प्रकल्पांची कामे आमच्या सरकारने सुरू केली आहेत. सरकारच्या कामांचा फायदा लोकसभा निवडणुकीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामती मतदारसंघात उभे राहू नका

महायुतीचा धर्म पाळून बारामतीच्या रिंगणातून माघार घेण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते व माजी आमदार विजय शिवतारे यांना सोमवारी झालेल्या चर्चेत दिला. मात्र शिवतारे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मतदासंघांतील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी माहिती दिली. शिंदे यांनी शिवतारे यांना चर्चेसाठी आज पुन्हा ‘वर्षा’ बंगल्यावर बोलविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT