Chikkodi Lok Sabha Sharad Pawar group leader Uttam Patil esakal
लोकसभा २०२४

'निपाणीसह सात मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळींना मताधिक्य देणार'; अखेर उत्तम पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीच्या प्रचारात सक्रिय राहणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तम पाटील सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात कार्यरत आहेत. मागील निपाणी विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती.

निपाणी : राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया आघाडीतील घटक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीच्या प्रचारात सक्रिय राहणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) स्वतंत्र अस्तित्व ठेवून प्रचाराची धुरा राबविण्यात येणार आहे. तसेच निपाणीसह सातही मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांना मताधिक्य देणार असल्याचे नेते उत्तम पाटील (Uttam Patil) यांनी सांगितले.

निपाणीतील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित नेते मंडळ व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी (Subhash Joshi), अशोककुमार असोदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. उत्तम पाटील सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात कार्यरत आहेत. मागील निपाणी विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यात त्यांचा माजी मंत्री शशिकला जोल्लेंविरुद्ध थोडक्या मतांनी पराभव झाला होता.

Chikkodi Lok Sabha Sharad Pawar group leader Uttam Patil

बैठकीस नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, दीपक सावंत, संजय पावले, दिलीप पठाडे, शेरू बडेघर, राजू पाटील-अक्कोळ, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, गोपाळ नाईक, निरंजन पाटील-सरकार, शिरीष कमते, इम्रान मकानदार, चेतन स्वामी, विष्णू कडाकणे व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून उत्तम पाटील कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आज त्यांनी भूमिका जाहीर करत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा दर्शविला असून चिक्कोडी लोकसभेचं चित्र बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

Jalgaon News : जळगाव फार्मसी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! 'बाटू' विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळेनात; प्रवेशाचा अंतिम टप्पा रखडला

Vaibhav Suryavanshi : ४,४,६.. उप कर्णधार म्हणून पहिल्याच रणजी सामन्यात वैभवची २८०च्या स्ट्राईक रेटने खेळी, केल्या इतक्या धावा

Ex-servicemen: माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मोठी दिवाळी भेट मिळाली, कुटुंबियांनाही होणार लाभ

SCROLL FOR NEXT