NCP Leader Uttam Patil esakal
लोकसभा २०२४

शरद पवारांचा निपाणीतील 'हुकमी एक्का' कोणाला साथ देणार? जोल्ले की जारकीहोळी? दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा भागीदार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट घेऊन पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन योग्य ती भूमिका घेतली जाईल.

निपाणी : गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वतंत्रपणे लढलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) व भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून आपणाशी संपर्क साधला जात आहे. निवडणुकीत मदत करण्याची मागणी होत आहे, मात्र आपण निर्णय न देता कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यात मते जाणून त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम पाटील (Uttam Patil) यांनी सांगित

शुक्रवारी (ता. ५) रात्री स्तवनिधी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर बैठकीत ते बोलत होते‌. श्री. पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक गरजेची आहे. या सर्व विषयांवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्यासमोर केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट घेऊन पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन योग्य ती भूमिका घेतली जाईल.

NCP Leader Uttam Patil

यावेळी माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा भागीदार आहे. देशात ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Congress candidate Priyanka Jarkiholi) यांना पाठिंबा द्यावा, असा बहुतेक कार्यकर्त्यांचा सूर आहे.

त्यामुळे उत्तम पाटील यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट करतील. यावेळी अशोककुमार असोदे, गोपाळ नाईक, राजू पाटील, दिलीप पठाडे, दत्ता नाईक, शौकत मनेर, विशाल गिरी, संजय पावले, बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT