CM Eknath Shinde Thane Constituency esakal
लोकसभा २०२४

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदान संघात दुपारी १:०० वाजेपर्यंत सगळ्यात जास्त मतदान झाले.

-राजीव डाके

Maharashtra Lok Sabha Election Fifth Phase : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर मतदान सुरु आहे.

ठाणे मतदारसंघातील (Thane Constituency) एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी १:०० वाजेपर्यंत सरासरी अंदाजे २६.०५ टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदान संघात दुपारी १:०० वाजेपर्यंत सगळ्यात जास्त मतदान झाले.

येथील मतदान झाल्याची टक्केवारी २९.८८ इतकी आहे. त्यापाठोपाठ ठाणे विधानसभा २९.५३, मिराभाईंदर २८.३९, बेलापूर २५.७२, ऐरोली २५.०७ आणि ओवळा माजिवडा येथे २०.१८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप मेडिकल एमर्जंशीची कोणतीही घटना समोर आली असल्याचे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

सकाळ ९ ते ११ वाजेपर्यंत झालेले मतदान

  • भिवंडी लोकसभा - २७.३४ %

  • ठाणे लोकसभा - २६.५ %

  • कल्याण लोकसभा - २२.५२ %

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT