Lakshmi Hebbalkar esakal
लोकसभा २०२४

'महाराष्ट्र एकीकरण समितीची मते भाजपला मिळाल्यानेच काँग्रेसचा पराभव'; 'या' बड्या नेत्याचं स्पष्टीकरण

मृणाल हेब्बाळकर यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडणूक लढवली होती.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मान्य केले.

बंगळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीची (Maharashtra Ekikaran Samiti) मते भाजपला (BJP) मिळाल्याने आपला मुलगा मृणाल हेब्बाळकर यांचा बेळगाव लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याचे महिला आणि बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी मान्य केले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही माहिती दिली.

मृणाल हेब्बाळकर यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यांचा भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांच्याकडून १.७८ लाख मताधिक्याने पराभव झाला. बेळगावमध्ये (Belgaum Lok Sabha Elections) तिरंगी लढत झाली, पण यावेळी भाजप आणि महाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र आल्याचे दिसत आहे, असे हेब्बाळकर म्हणाल्या.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत समिती उमेदवाराला ४५ हजार मते मिळाली. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी यांना ४ लाख, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला १.३० लाख मते मिळाली. यावेळी म. ए. समितीला उमेदवाराला केवळ नऊ हजार मते मिळाली आहेत.

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मान्य केले. २०१८ मध्ये आपल्याला ५२ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. वर्षभरानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघातून सुरेश अंगडी ७९ हजार मतांनी आघाडीवर होते. २०२३ मध्ये मी ५९ हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे मतदारांचा मूड निवडणुकीपेक्षा वेगळा असतो, असे त्या म्हणाल्या.

लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीची जबाबदारी काँग्रेस हायकमांडने संबंधित मंत्र्यांवर सोपविली होती. पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यास मंत्रिपदावर गंडातर येईल, असा इशाराही दिला त्यामुळे हेब्बाळकर आता अडचणीत आल्याची चर्चा आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघात मराठी मतदारांचे स्पष्ट बहुमत आहे. परंतु रेंगाळलेला सीमाप्रश्न व राजकीय नेत्यांनी मराठी मतदारांना विविध मार्गाने आकर्षित केल्याने दोन-तीन विधानसभा निवडणुकीत समिती उमेदवारांचा पराभव झाला.

मराठी बहुल मतदारसंघात पक्षवार पडलेली मते अशी

मतदारसंघ भाजप काँग्रेस मतांची आघाडी

  • बेळगाव ग्रामीण १,२४,९७० ७४,४४१ ५०,५२९

  • बेळगाव दक्षिण १,१९,२४९ ४६,०२९ ७३,२२०

  • बेळगाव उत्तर ८३,९३८ ८१,५३७ २,४०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT