Congress Manifesto release 
लोकसभा २०२४

Congress Manifesto : जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा, अग्निपथ योजना रद्द, स्वामिनाथ आयोगाची अंलबजावणी; असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये 'GYAN' या संकल्पनेवर अर्थात G- गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N- नारी या सर्वांना न्याय देणारा जाहीरनामा असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे.

पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे या जाहीरनाम्यात जम्मू आणि काश्मीर राज्य आणि सैन्यातील अग्निवीरांची भरती याबाबत काही महत्वाची भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. (Full statehood to Jammu and Kashmir cancellation of Agneepath scheme implementation of Swaminath Commission read Congress manifesto)

काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार, जर काँग्रेस सत्तेत आली तर जम्मू आणि काश्मीर राज्याला तातडीनं पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. तसेच भारतीय सैन्यातील तिन्ही दलांमध्ये अधिकाऱ्यांशिवाय सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना मोदी सरकारनं आणली आहे. १६ जून २०२२ रोजी ही योजना लागू करण्यात आली. (Latest Marathi News)

या योजनेंतर्गत सैन्यात सहभागी होणाऱ्या जवानांना अग्निवीर नावानं ओळखलं जात आहे. ही योजना चार वर्षांसाठीची शॉर्ट टर्म योजना असून ती कायम सेवा नसून तात्पुरती सेवा आहे. त्यामुळं तरुणांवर अन्याय होत असून ही योजना रद्द करुन त्या ठिकाणी नियमित सैनिकांची भरती करणार असल्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देणार असल्याचंही काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

काँग्रेसच्या घोषणा पत्रात काय?

  1. केंद्र सरकारमध्ये ३० लाख नोकऱ्या

  2. गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये

  3. जातनिहाय जनगणना

  4. एमएसपीला कायदेशीर दर्जा

  5. मनरेगा मजुरी ४०० रुपये

  6. ईडीचा गैरवापर टाळण्यासाठी पीएमएलए कायद्यात सुधारणा

  7. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार

  8. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण

  9. पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन

  10. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

  11. सैन्य भरतीत आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी अग्निपथ योजना रद्द करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT