Sangli Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha Constituency  esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : चंद्रहार यादीत, विशाल दिल्लीत! सांगलीवरुन 'मविआ'त ताण वाढला; शिवसेनेच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

सकाळ डिजिटल टीम

सेनेच्या काल जाहीर करण्यात आलेल्या सोळा उमेदवारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर चंद्रहार यांचे नाव आहे. आमच्या दृष्टीने सांगलीचा विषय संपला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या. शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवारांच्या यादीत चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या नावाची घोषणा केली, तर काँग्रेस (Congress) नेत्यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेत सांगलीवरील दावा सोडू नका, अशी विनंती केली. शिवसेनेच्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाविकास आघाडीत ताण आणखी वाढला.

त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने माजी आमदार प्रकाश शेंडगे सांगलीतून लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, अशी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीत सांगलीबाबतचा ताण वाढवणाऱ्या घडामोडींनी आजचा दिवस गाजला. शिवसेना (ठाकरे) पक्षातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) हेच लढतील, यावर शिवसेनेच्या (Shiv Sena) यादीतून आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

सेनेच्या काल जाहीर करण्यात आलेल्या सोळा उमेदवारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर चंद्रहार यांचे नाव आहे. आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. चंद्रहार पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत सेनेत प्रवेश केला होता. तेथेच उमेदवारीचे संकेत मिळाले होते. मिरजेत उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभा घेतली, त्यावेळीही चंद्रहार यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

आज थेट उमेदवार यादीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसैनिकांनी त्याचे स्वागत केले. महाविकास आघाडी एकत्र लढेल, काही वाद आहेत ते संपतील आणि एकजुटीने प्रचार करू, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीत भेटीगाठी

शिवसेनेची यादी जाहीर होत असताना काँग्रेस नेते दिल्लीच्या विमानात होते. आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दुपारी दिल्लीत दाखल झाले. आधी त्यांनी वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांची भेट घेतली. त्यानंतर के. सी. वेणुगोपाल यांना भेटून आग्रही भूमिका मांडली. सायंकाळी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत काँग्रेस सांगली लढायला तयार आहे, असा संदेश दिला.

रात्री उशिरा विश्‍वजित हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. या नेत्यांकडून सांगलीतील परिस्थितीचा आढावा सादर करण्यात आला. शिवसेना ज्या पद्धतीने सांगलीसाठी रेटा लावत आहे, तो चुकीचा आहे. शिवसेनेने माघार घ्यावी, अन्यथा काँग्रेसने येथून मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. श्री. खर्गे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काँग्रेस नेते बोलतील. त्यांनी विनंती मान्य केली नाही, तर काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.

८० वर्षे आम्ही काँग्रेसच्या सेवेत

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विशाल पाटील यांनी गेली ८० वर्षे वसंतदादांचे कुटुंब काँग्रेसच्या सेवेत असल्याचा दाखला दिला. शिवसेना सात दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळण्यासाठी आग्रह करत आहेत. आमचे आजोबा स्वातंत्र्य लढ्यात होते. तेव्हापासून काँग्रेससोबत आहोत. आम्हाला का संघर्ष करावा लागतोय, अशी भूमिका मांडली. केवळ हट्ट म्हणून नव्हे, तर मेरिटवर उमेदवारी मिळावी. आम्ही यावेळी सांगली पुन्हा जिंकून दाखवू, असा विश्‍वास विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिला.

शेंडगे लढल्यास ‘वंचित’चा पाठिंबा

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे सांगलीतून लढण्याच्या तयारीत आहेत. शेंडगे सांगलीतून लढणार असतील, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत केली. प्रकाश शेंडगे यांनी सांगलीतून लढण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. ते मैदानात असतील तर सांगलीची निवडणूक बहुरंगी होताना दिसेल.

चर्चेनंतरच सांगली आमच्याकडे : राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपावरून काँग्रेससोबत असलेल्या मतभेदावर भाष्य केले. ‘‘रामटेक ही आमची जागा असून त्या ठिकाणी आम्ही सातत्याने जिंकत आहोत. काँग्रेसने रामटेकमधून उमेदवार जाहीर केला, त्यावर आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. चर्चेतून त्या जागेचा प्रश्न सुटला होता. त्या जागेऐवजी आम्ही ईशान्य मुंबईची जागा लढू असे आघाडीच्या बैठकीत ठरले होते. पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागा नाहीत. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा आहे. त्याठिकाणी आम्ही ३० वर्षे लढत आहोत. छत्रपती शाहू महाराज ही जागा काँग्रेसच्या चिन्हावर लढवत असल्याचे समजताच आम्ही ही जागा काँग्रेससाठी सोडली. त्यामुळे महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेतूनच सांगलीची जागा आम्हाला देण्यात आली,’’ असा दावा राऊत यांनी केला.

शिवसेनेने एका शेतकऱ्याच्या मुलाला व लाल मातीची सेवा करणाऱ्या पैलवानाला उमेदवारी दिली आहे. भाजपचे अकार्यक्षम खासदार संजय पाटील यांच्या विरोधात ही लढाई आहे. त्यात काँग्रेसने मला साथ द्यावी, एकत्र यावे.

-चंद्रहार पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT