Uddhav Thackeray Esakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

आज तुम्ही शिवाजी पार्कवर पंतप्रधान म्हणून शेवटचं बोलून घ्या, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महायुतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी पार्कवरुन आज भाषण केलं. पण याच भाषणावर दुसरीकडं बीकेसीतील सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला. तुम्ही आता ४ जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत. त्यामुळं ४ जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. (Country will demodination this is modiji las speech at Shivaji Park Uddhav Thackeray attacked on Prime Minister)

ठाकरे म्हणाले, "आता चार जूनपर्यंतची पंतप्रधान मोदींची शेवटी सभा असल्यानं ते सध्या बोलायला उभे राहिलेत. कारण ४ जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत हे आपण ठरवलेलं आहे. मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला होता. काल मोदींनी आपल्याला फसवलं आणि नोटबंदी जाहीर केली, ते टीव्हीवर आले आणि त्यांनी डिमॉनिटायझेशन केलं. त्याचप्रमाणं मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवरुन बोलताय बोलून घ्या.

पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आलात बोलून घ्या. कारण ४ जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. याचा अर्थ असा की चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते तसे चार जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहणार, कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान राहणार नाही"

ठाकरे पुढे म्हणाले, "मला काही वेळा लोकांची कीव येते, काय लोक जमवतात जणून देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. महागाई कमी झालेली आहे, सर्वांना रोजगार मिळालेला आहे. सर्वजण खाऊन पिऊन ढेकर देऊन पडलेत. चीन तिकडं आतमध्ये घुसला आहे. तिकडं ना मोदी जायला तयार ना अमित शहा जायला तयार नाही. पण सगळी फौज भाडोत्री, गद्दारांना घेऊन आज उद्धव ठाकरेंना संपवायला इकडे आलेले आहेत. पण मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करुन बघा, हा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT