BJP in America  sakal
लोकसभा २०२४

BJP in America : भाजपमित्रांची अमेरिकेत वातावरणनिर्मिती

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रत्येक राज्यांत जोरदार प्रचार सुरू केला असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच प्रतिबिंब अमेरिकेतही पडले असून येथील भाजप समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या रॅली काढण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रत्येक राज्यांत जोरदार प्रचार सुरू केला असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच प्रतिबिंब अमेरिकेतही पडले असून येथील भाजप समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या रॅली काढण्यास सुरुवात केली आहे.

ओव्हरसीज फ्रेंड्‌स ऑफ बीजेपी’ या संघटनेने अमेरिकेतील वीस शहरांमध्ये रॅली काढत नरेंद्र मोदी यांना समर्थन जाहीर केले. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यंदाच्या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा मिळवून द्याव्यात, असे आवाहनही या रॅलींत सहभागी झालेल्या भाजप समर्थकांनी केले.

‘अमेरिकेतील भारतीय समुदायाला यंदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता असून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर पाहण्याची इच्छा आहे,’ असे मत या संघटनेचे सरचिटणीस वासुदेव पटेल यांनी सांगितले. या संघटनेने वॉशिंग्टन, व्हर्जिनिया, मेरीलॅंड, न्यूजर्सी, अटलांटा, जॉर्जिया या राज्यांमध्ये रॅली आयोजित केल्या होत्या.

प्रत्येक ठिकाणी किमान दोनशे मोटारी रॅलीमध्ये सहभागी झाल्या. भाजप समर्थकांनी काढलेल्या या रॅलींवेळी भाषणेही करण्यात आली. यावेळी मोदी सरकारने विकासासाठी केलेल्या कामांबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, भारत-अमेरिका मैत्री दृढ करण्यासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाबद्दलही माहिती दिली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT