Mamata Banerjee  sakal
लोकसभा २०२४

Mamata Banerjee : खोटेपणाबद्दल भाजपला लाज वाटायला हवी; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका

संदेशखाली प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते तृणमूल काँग्रेसवर टीका करत असतानाच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बरसात : संदेशखाली प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते तृणमूल काँग्रेसवर टीका करत असतानाच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकीकडे संदेशखालीबाबत मोदी चुकीची माहिती पसरवित आहेत, तर दुसरीकडे लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याबाबत ते काहीच बोलत नाहीत,’ अशी टीका ममतांनी केली आहे.

मोदी यांनी आज सभा घेतलेल्या बराकपूर मतदारसंघातच ममता बॅनर्जींनीही सभा घेतली. ममता म्हणाल्या,‘‘संदेशखालीबाबत भाजपचा डाव जनतेला समजला आहे, त्याबद्दल त्यांना लाज वाटायला हवी. मोदी स्वत: या प्रकरणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. मात्र, राज्यपालांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले असतानाही भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसलेले आहेत. वास्तविक केंद्र सरकारने राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगायला हवे होते.’’

आंदोलनासाठी पैसे?

कोलकता : संदेशखाली प्रकरणातील आरोपी शहाजहान शेख याच्याविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी ७० हून अधिक महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळाल्याचे भाजपचा स्थानिक नेता सांगत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुमारे ४५ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भाजपचे विभागप्रमुख गंगाधर कायल हे महिलांना पैसे मिळाल्याबद्दल सांगत आहेत. कायल यांचा अशाच प्रकारचा व्हिडिओ मागील आठवड्यातही प्रसिद्ध झाला होता आणि यामध्ये त्यांनी संदेशखाली प्रकरणातील आरोप बनावट असल्याचे म्हटले होते. आज प्रसिद्ध झालेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा भाजपने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT