Manikrao Thakare sakal
लोकसभा २०२४

Manikrao Thakare : एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंचा विश्‍वासघात ; पुण्यात माणिकराव ठाकरे यांची टीका

‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी होणाऱ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी होणाऱ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. सरकारमध्ये असतानाही शिंदेच सर्व निर्णय घेत होते, याचा मी साक्षीदार आहे. तरीही शिंदे यांनी ठाकरे यांचा विश्‍वासघात केला,’’ अशी टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, अजित दरेकर यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘यापूर्वी राज्यात होणाऱ्या निवडणुकांना राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे‌ अजित पवार जागा ठरवत. त्यात शरद पवार कधीही हस्तक्षेप करत नव्हते. मात्र आज अजित पवारांची अवस्था काय आहे. त्यांनी आज एवढे मिंधे होण्याची गरज काय? भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले. महाविकास आघाडीच्या काळात या दोघांना जी उंची होती; ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजपबरोबर जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.’’

ठाकरे म्हणाले...

  • फडणवीस व भाजपने सूड उगवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडले

  • अजित पवारांना मोदी-शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेतले

  • षड्‌यंत्र करणारे सर्वांना माहीत; अजित पवार, एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे

  • अजित पवारांना चार जागा दिल्या; त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले

  • पक्ष फोडणे आणि चिन्ह चोरण्यात भाजप व्यग्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT