Sonia Gandhi  sakal
लोकसभा २०२४

Sonia Gandhi : घटना बदलण्याचे कारस्थान ,सोनिया यांचा घणाघात; काँग्रेसच्या प्रचारात मोदींवर टीका

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला महान समजत देश आणि लोकशाहीच्या मर्यादेचे वस्त्रहरण करत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी धमकावले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

जयपूर : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला महान समजत देश आणि लोकशाहीच्या मर्यादेचे वस्त्रहरण करत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी धमकावले जात आहे. आज लोकशाही संपुष्टात आली आहे. आपला देश संकटात आहे. आपली राज्यघटना बदलण्याचे कारस्थान केले जात आहे,’’ असा घणाघात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी व भाजपवर केला.

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा ‘न्यायपत्रा’चे प्रकाशन आज जयपूरमध्ये झाले. त्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारात सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी-वद्रा उपस्थित होत्या. भाजपला लक्ष्य करीत सोनिया गांधी म्हणाल्या, ‘‘आपल्या देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही संस्थांचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे आणि आपली राज्यघटना बदलण्याचे कारस्थान रचले जात आहे. ही हुकूमशाही आहे. आपण सर्वजण त्याचा सामना करू. आज देशात खाण्या-पिण्यापासून सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून देश अशा सरकारच्या हाती होता, ज्यांनी बेरोजगारी, चलनवाढ, आर्थिक संकट आणि असमानता वाढविण्यासाठी कोणतेही कसर सोडली नाही.’’

काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी अनेक आश्‍वासनेही दिली. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने जाहीरनाम्यात जी आश्‍वासने दिली आहेत, ती पूर्ण केली जातील, अशी ग्वाहीही सोनिया गांधी यांनी दिली.

...तर लोकशाहीचा बचाव

‘‘तुम्ही जे मत देणार आहात, ते देशातील लोकशाहीचा बचाव करेल. आपली लोकशाही धोक्यात कशी, असे तुम्हाला वाटत असेल; तर लोकशाही मजबूत करण्यासाठी ज्या मोठ्या-मोठ्या संस्था उभारण्यात आल्या आहेत, त्या कमजोर करण्यात येत आहेत. त्यांचा दुरुपयोग होत आहे, हे यामागील कारण आहे. लोकांना ‘ईव्हीएम’वर भरवसा राहिलेला नाही.

प्रियांका गांधींची टीका

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, जाहीरनाम्याला आम्ही ‘न्यायपत्र’ असे नाव दिले आहे. निवडणुकीनंतर आम्ही विसरून जाऊ, अशा घोषणांची ही यादी नाही, हे लक्षात येण्यासाठी त्याला ‘न्यायपत्र’ असे म्हटले आहे. हा संघर्षाचा आवाज आहे, या देशाचा आवाज आहे, जो आज न्यायाची मागणी करीत आहे. देशात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर आहे. ती हटविण्यासाठी सरकारने काय केले? आश्‍वासने दिली, पण ती पूर्ण केली नाहीत. अग्निवीर योजना लागू करून लोकांच्या आशांवर पाणी फिरविले. पेपरफुटीच्या घटना प्रत्येक राज्यात घडत आहेत. शेतकरी रस्त्यांवर आंदोलने करीत आहे, पण मोदी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.

राहुल अमेठी, तर प्रियांका रायबरेलीतून?

नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढणारे राहुल गांधी, उत्तर प्रदेशातील गांधी कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीमधूनही लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसमधून मिळत आहेत. यासोबतच प्रियांका गांधींनी रायबरेली मतदारसंघातून लढण्यासाठी पक्ष संघटनेचा आग्रह असल्याचेही समजते. उत्तर प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी केली असून, येथील लोकसभेच्या ८० जागांपैकी काँग्रेस १७ तर समाजवादी पक्ष ६३ जागांवर लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT