PM Narendra Modi  esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

कोणी आणि का केलीए ही मागणी? जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश द्या, अशा मागणीची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. यामुळं पंतप्रधानांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी धर्मिक देवदेवतांच्या नावानं भाजपसाठी मत मागितल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला होता. (Delhi HC dismisses plea seeking direction to ECI to disqualify PM Narendra Modi)

नेमकं काय घडलं?

याचिकार्त्यानं आरोप केला आहे की, उत्तर प्रदेशातील पिलभित या मतदारसंघात प्रचारदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी मत मागताना हिंदू देवदेवतांचा हिंदू मंदिरांचा उल्लेख केला. त्याचबरोबर शिख गुरु आणि पवित्र स्थळांचा देखील मोदींनी मत मागण्यासाठी वापर केला. (Marathi Tajya Batmya)

निवडणूक आयोगानं काय म्हटलं?

निवडणूक आयोगाच्यावतीनं कोर्टात बाजू मांडणारे अॅड. सिद्धांत कुमार यांनी या याचिकेला विरोध करताना सांगितलं की, अशा प्रकारच्या तक्रारींचे अर्ज आमच्याकडं दररोज येत असतात. त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कारवाया देखील करतो. याचिकाकर्त्यांचा अर्जही आमच्याकडं आला असून आम्ही त्यावर कार्यवाही करणार आहोत. निवडणूक आयोग ही एक संविधानिक यंत्रणा आहे. (Latest Marathi News)

कोर्टानं काय म्हटलं?

याचिका फेटाळताना, कोर्टानं म्हटलं की याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि न्यायालय कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT