Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : घटना बदलण्याचा प्रचार खोटारडा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते घटना बदलणार, असा खोटा प्रचार करीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते घटना बदलणार, असा खोटा प्रचार करीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिव-संभाजी स्वराज्य प्रतिष्ठानने आयोजित केलेला बहुजन मेळावा व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, महायुती महिलांचा सन्मान करणारी असून विरोधक मात्र महिलांसंदर्भात अपशब्द काढतात.

त्यांच्या घरात आई-बहिणी नाहीत का? असा सवाल करीत त्यांनी टीका केली. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी व काँग्रेस नेते राहुल गांधींवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, की आघाडीत नेतृत्व करणारा नेता दिसत नाही. त्यांच्यात सगळी खिचडी झाली आहे. राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात मंत्रिपद घेऊन अनुभव घ्यायला पाहिजे होता. देशहितासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा खंबीर नेतृत्व असा उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT