Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : विकासासाठी विजयी करा ; सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

‘‘आगामी पाच वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना विजयी करा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ५) येथे केले.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : ‘‘आगामी पाच वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना विजयी करा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ५) येथे केले. प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना त्यांनी भावनिक न होता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, राज्याच्या निधीला केंद्राची जोड मिळाल्यास विकासाला गती येईल, हा विचार नजरेसमोर ठेवून निर्णय घ्या, असे पवार म्हणाले. आजपर्यंतच्या सांगता सभांपैकी सर्वांत विक्रमी गर्दी या सभेला झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारामतीमधील टीसी कॉलेज रस्त्यावरील मिशन ग्राउंडवर महायुतीच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘‘आपल्यावर होणाऱ्या टीकेला मतदान झाल्यावर उत्तर देईन,’’ असा इशारा अजित पवार यांनी दिला. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘साहेबांचा विरोध असताना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले. राजकारणाचे बाळकडू मीच दिले. माझ्यावरच टीका करता का? मी तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे बघितले.’’ रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या सभेत भावुक झाले, तो धागा पकडून अजित पवार म्हणाले, ‘‘डोळ्यातून पाणी काढण्याची नौटंकी करू नका; विकासावर बोला, रडीचा डाव खेळायचा नाही.’’

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून आयुष्यात एकही कुस्ती न खेळलेले कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, त्यांना डाव तरी माहिती आहेत का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

‘...तर पळता भुई थोडी होईल’

आपल्यावर टीका करणाऱ्या कुटुंबीयांना उद्देशून अजित पवार म्हणाले, ‘‘फार उड्या मारू नका, निवडणूक औटघटकेचीच आहे. निवडणूक झाल्यावर यातला एकही जण येथे दिसणार नाही. नंतर तुम्ही आणि मीच येथे असणार आहोत.’’

अजित पवार हे सुनेत्रा पवार यांची पर्स घेऊन दिल्लीत जाणार का? अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती, त्याला उत्तर देताना सदानंद सुळे हे तुमची पर्स नेतात का? असा सवाल अजित पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘‘मी जर बोलायला लागलो; तर तुमची पळता भुई थोडी होईल. तुम्ही थेट मुंबईच गाठाल. आपलीच बहिण आणि भावंडं आहेत म्हणून मी दर वेळी जाऊ दे म्हणतो.’’

अजित पवार म्हणाले....

अजित पवार म्हणाले....


एकमेकांत भांडून उपयोग नाही, विकास होत नाही, हे लक्षात आल्याने सर्व विरोधक एकत्र आलो

  • बारामती, इंदापूर, पुरंदरसह लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार

  • जिराईत शब्दाचे रूपांतर बागायती शब्दात करणार

  • शेती, पाणी, रेल्वे, विमानतळ, मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याचा पंतप्रधानांचा मला शब्द

  • वडिलधाऱ्यांबद्दल कायमच आदर होता, आजही आहे

  • सर्वच आरक्षणांना आमचे कायमच समर्थन

प्रचाराच्या निमित्ताने जेथे जेथे गेले तेथे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले, लोकांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याने मी कमालीची समाधानी आहे, लोकांना बदल हवा आहे आणि आता विजय दूर नाही असेच चित्र दिसते आहे. महायुतीतील सर्वच पक्षातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचारासाठी धावपळ केली, त्या बद्दल मी कृतज्ञ आहे.

- सुनेत्रा पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT