Devendra Fadnavis sakal
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis : भारतासाठी भाजपला मतदान करा ; विकासाचा मार्ग मोकळा करा

मतदारांनी संजय पाटील यांच्या नावासमोरील कमळाचे बटण दाबून दिलेली मते त्यांना तर मिळतीलच, पण ती मते नरेंद्र मोदींनाही मिळणार आहेत. तेव्हा यावेळचे मतदान हे भाजपसाठी नाही, तर भारतासाठी आहे.

सकाळ वृत्तसेवा

कडेगाव (जि. सांगली) : ‘‘मतदारांनी संजय पाटील यांच्या नावासमोरील कमळाचे बटण दाबून दिलेली मते त्यांना तर मिळतीलच, पण ती मते नरेंद्र मोदींनाही मिळणार आहेत. तेव्हा यावेळचे मतदान हे भाजपसाठी नाही, तर भारतासाठी आहे. भारतासाठी भाजपला मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे. तेव्हा कमळासमोरील बटण दाबा आणि विकासाचा मार्ग मोकळा करा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

कडेगाव येथे सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय पाटील (भाजप) यांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘सांगली, सातारा आणि सोलापूरमधील सिंचन योजनांची काँग्रेस सरकारच्या काळात काय गती होती. विदर्भात सांगायचे निधी पश्चिम महाराष्ट्रात दिला आहे, तर इकडे सांगायचे विदर्भात दिला आहे.

पण प्रत्यक्षात पैसा कोठेच देत नव्हते. मात्र सांगलीतील आणि राज्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोदींनी आतापर्यंत २६ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मोदींनी पुढील पाच वर्षांसाठी ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. १० लाखांपर्यंत ६० कोटी लोकांना मोदी यांनी मुद्रा कर्ज दिले.

मोदींमुळे भारत जगातील तिसरा मोठा अर्थव्यवस्था असणारा देश होईल. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते तेव्हा देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. दहशतवादी हल्ले रोखण्यात मोदींनी यश मिळवले आहे.’’ नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. तसेच देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे.

- संजय पाटील,

भाजपचे उमेदवार, सांगली

कोरोना लशीची उतराई करा

ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत विकासाची गती बदलली आहे. दहा वर्षांत देश बदलला आहे. गरिबांना पक्की घरे दिली, शौचालय दिले, नळाला पाणी दिले. नरेंद्र मोदींनी कोरोना लस दिली. म्हणून त्याची उतराई म्हणून व देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी भाजपला मत द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT