Murder esakal
लोकसभा २०२४

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये आज लोकसभेचं मतदान होत आहे, त्याच दरम्यान हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर एका राजकीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय वादातून ही घटना घडल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. पण वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Dharashiv Political Murder Gaurav Naiknavare case has been registered against four people)

पोलिसांच्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील पाठसांगवी इथं दोन गटात झालेली मारहाणीची घटना ही वैयक्तिक कारणावरुन झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. मतदान केंद्राच्याबाहेर गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे (वय २३) आणि समाधान नानासाहेब पाटील (वय २७) यांच्यात वैयक्तिक कारणावरुन वाद झाला. यानंतर दोघांच्या वैयक्तिक वादातून धारदार हत्यारानं गौरव नाईकनवरे यानं समाधान पाटील याच्यावर वार केले, यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

दरम्यान, खून झालेला तरुण हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. पण पोलिसांनी हा दावा नाकारला आहे. ही घटना मतदानाच्या अथवा निवडणुकीच्या संदर्भात घडलेली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच आता या मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission: केंद्र आठवा वेतन आयोग कधी लागू करणार? मोठी अपडेट आली समोर, सरकारची योजना काय? वाचा...

INDW vs NZW: स्मृती मानधनापाठोपाठ प्रतिका रावलचंही न्यूझीलंडविरुद्ध खणखणीत शतक! वर्ल्ड रेकॉर्ड्ससह रचली ८ मोठे विक्रम

Bidkin News : देशसेवा आणि समाजसेवेला वाहिलेले जीवन संपले! नारायण लघाने यांच्या निधनाने गावात शोककळा

Kalyan News : सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, कचऱ्यामध्ये चुकून आलेला सोन्याचा हार महिलेला केला परत; प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक

Selu Crime : वालूरमध्ये दरोड्याची साखळी; नातवाचा खून, आजी जखमी तर वृद्ध दाम्पत्यावरही खुनी हल्ला करून दागिने लंपास

SCROLL FOR NEXT