dhule lok sabha election pm modi or gandhi onion politics Sakal
लोकसभा २०२४

मोदी, गांधी यांच्यापैकी कुणाची जादू चालणार?

वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- निखिल सूर्यवंशी

Dhule News : शेतीविकास, कांद्याची निर्यात, प्रकल्पातून शहरासाठी पाणी पळविणे, सिंचन, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जीएसटी, औद्योगिक विकास आणि बेरोजगारी आदी प्रश्‍न, हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्याक लढाईचे चित्र निर्माण करणे आणि शेती, कांदा, सिंचन, बेरोजगारीप्रश्‍नी प्रचारात ठोस आश्‍वासनांचा अभाव असे चित्र लोकसभेच्या धुळे मतदारसंघात प्रचारादरम्यान होते.

वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. एकीकडे कांद्याच्या निर्यातीचा प्रश्‍न भाजप- महायुतीच्या डोळ्यातून पाणी काढत असताना काँग्रेस- महाविकास आघाडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सहानभुती मिळविण्यासाठी सरसावली आहे.

जातीय समीकरण बदलले

धुळे लोकसभा मतदारसंघात सरासरी पाच ते साडेपाच लाख मराठा- पाटील, पावणेचार लाख मुस्लीम, साडेतीन लाख आदिवासी, दीड लाख दलित मतदार आणि उर्वरित लोणी मराठा, माळी, कोळी, धनगर, वाणी, राजपूत व अन्य जातीसंवर्गाच्या मतदारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार रिंगणात असते,

तर मुस्लीमबहुल मालेगाव व धुळे मतदारसंघात या समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असता. मात्र, मुस्लीम समाजाचे सरासरी ८० टक्के मतदान काँग्रेसला, तर मणिपूरप्रश्‍नी नाराज आदिवासी आणि दलित समाजातील नाराज मतदारांचीही काँग्रेसला पसंती राहण्याचे चिन्ह असल्याने काँग्रेसला ‘सेफ झोन’ मध्ये असल्याचे वाटत आहे.

भाजप- महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे प्रचारात दशकाच्या कारकिर्दीत सिंचन, पाणी, रेल्वे, दळणवळणाच्या सुविधा बळकटीकरणाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी शेतीसह सर्वांगिण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवला आहे.

बेरोजगारीच्या मुद्याला नंदुरबारच्या सभेतून बगल देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, धुळ्याच्या सभेत बगल देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अशा भूमिकेमुळे भाजप- महायुतीच्या उमेदवारासमोर ही नाराजी दूर सारण्याचे आव्हान आहे. या स्थितीत देशाची सुरक्षितता, अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेणे, जलसिंचनाचा नार- पार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे लागेल असा प्रचार महायुतीकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

Latest Marathi News Update: मिसिंग लिंक पुन्हा सुरू; कोसळलेल्या दरडीचा मलबा हटवला

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

सोलापूर विद्यापीठाची २९ सप्टेंबरपासून परीक्षा! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अडीच महिने आधी वेळापत्रक जाहीर, वर्गांत सीसीटीव्ही, ७५ टक्के हजेरीचे बंधन, वाचा...

SCROLL FOR NEXT