Sanjay Raut sakal
लोकसभा २०२४

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांनी बॅगांमधून १२ कोटी आणले! ;संजय राऊत यांचा ‘एक्स’वरून थेट आरोप

राज्याचे ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण’ अशी पोस्ट करत करत हेलिकॉप्टरच्या लॅंडिंगनंतर बॅगा घेऊन जाणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा वादात सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: राज्याचे ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण’ अशी पोस्ट करत करत हेलिकॉप्टरच्या लॅंडिंगनंतर बॅगा घेऊन जाणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा वादात सापडला आहे. मुख्यमंत्री शिंदे नऊ बॅगांमध्ये बारा ते तेरा कोटी रुपये घेऊन नाशिकमध्ये आल्याचा थेट आरोप राऊत यांनी केल्याने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाला हा व्हिडिओ टॅग करण्यात आल्याने आयोग काय भूमिका घेणार? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मागील आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनदा नाशिकमध्ये आले. रविवारी (ता.१२) महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते संध्याकाळी हेलिकॉप्टरने दाखल झाले. पोलिस मुख्यालयाजवळील मैदानावर हेलिकॉप्टर उतरले.

मुख्यमंत्र्यानंतर काही पोलिस काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन उतरल्याचा व्हिडिओ राऊत यांनी आज ‘एक्स’ वर शेअर केला. त्यासोबत ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.. नुसता पैशांचा पाऊस... दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे’ अशी पोस्टही त्यांनी केली.

‘किती बॅगा घेऊन उद्धव ठाकरे आले?’

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते, हे तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) माहिती आहे का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला. बॅगांवरून पैशांचा आरोप करणे, हा राऊत यांचा नवा जावईशोध आहे. पैशांचा पाऊस पाडून कोणालाही निवडणूक जिंकता येत नाही. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्यावर त्यांच्याकडून कारणे सांगितली जाताहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT