Delhi Liquor Scam sakal
लोकसभा २०२४

Delhi Liquor Scam : ‘आप’ अन् केजरीवाल दोघेही आरोपी; न्यायालयामध्ये ‘ईडी’कडून आठवे आरोपपत्र

दिल्लीतील कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज आठवे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आरोपी करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज आठवे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आरोपी करण्यात आले आहे. दिल्लीच्या दिल्ली राउज अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

एखाद्या राजकीय पक्षाला अशाप्रकारे आरोपी केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे ऐन निवडणूक हंगामामध्ये ‘आप’ समोरील अडचणी वाढू शकतात. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मद्य धोरण आखणी आणि अंमलबजावणी यातील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती.

यानंतर ‘ईडी’ने ‘पीएमएलए’ (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ‘ईडी’ने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानातून अटक केली होती. तूर्त ते अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्या अटकेला आणि न्यायालयीन कोठडीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

आरोप सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांकडे पुरेसे पुरावे असल्याचे ‘ईडी’ ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. ‘ईडी’ने आज आरोपपत्र दाखल करून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आरोपी केले.

हवाला ऑपरेटरशी संवाद उघड

केजरीवाल यांचा हवाला ऑपरेटरशी झालेला संवाद आमच्या हाती लागला असल्याचे ‘ईडी’ने न्यायालयामध्ये सांगितले. संबंधित हवाला ऑपरेटरच्या ताब्यातून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस जप्त करण्यात आली असून, त्याचे पासवर्ड शेअर करायला मात्र केजरीवाल यांनी नकार दिला असल्याचे तपास संस्थेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT