Eknath Khadse sakal
लोकसभा २०२४

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांची भाजपवापसी होणार

‘‘मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे असे म्हणता येणार नाही. ते तर मी बांधलेले घर आहे. मी माझ्या घरात परत जात आहे. जाण्याचा दिवस आपण जाहीरपणे कळविणार आहोत,’’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘‘मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे असे म्हणता येणार नाही. ते तर मी बांधलेले घर आहे. मी माझ्या घरात परत जात आहे. जाण्याचा दिवस आपण जाहीरपणे कळविणार आहोत,’’ अशा शब्दांत शरद पवार गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घरवापसीवर भाष्य केले.

खडसे हे भाजपत जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याबाबत संकेतही मिळत होते. मात्र आज खडसे यांनी आपल्या घरवापसीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. आज मुंबई येथे त्यांनी ही घोषणा केली आहे.

मात्र ते घरवापसी केव्हा करणार? याची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. खडसे यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘होय..! मी भारतीय जनता पक्षात घरवापसी करणार आहे. मात्र आज नव्हे तर लवकरच आपण हा निर्णय घेणार आहोत. भाजपमध्ये मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातो असे म्हणावे लागेल.

भारतीय जनता पक्ष हे माझे घर आहे. ते मी बांधले आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केले त्यातून ते उभे राहिले आहे. मुलांच्या नाराजीमुळे वडिलांना घराबाहेर काढले जाते आणि वडिलांनाही नाइलाजास्तव जावे लागते. त्या प्रमाणे आपल्यावरही नाराजी होती. त्यामुळे आपल्याला घराबाहेर काढले गेले. परंतु आपण आता पुन्हा आपल्या घरी जाणार आहोत हे निश्चित आहे.’’ मध्यंतरी खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT